ताज्या घडामोडी

अन्नाची नासाडी म्हणजे राष्ट्रीय सम्पत्तीची हानी – सौ स्मिता कदम

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

अन्नाची नासाडी म्हणजे राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे.त्यामुळे अन्न वाचवा आपले कष्टाचे पैसे वाचवा आणि पर्यायाने पर्यावरण वाचवा ,देशाचे आरोग्य सांभाळण्याच्या कार्यात हातभार लावूया असे प्रतिपादन कोटेश्वर महिला मंडळाच्या संचालिका सौ.स्मिता कदम यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न, शिराळा तालुका पत्रकार संघ,व कोटेश्वर महिला मंडळ यांच्या विद्यमाने अन्न वाचवा,या अभियानांतर्गत यशवंत बालक मंदीर शिराळा या ठिकाणी सौ.कदम बोलत होत्या.
यावेळी मुख्याध्यापक संजय पाटील तसेच महिला मंडळाच्या संचालिका सौ.सीमा डांगे,सौ.दीपाली निकम या प्रमुख उपस्थितीत होत्या.
सौ.स्मिता कदम म्हणाल्या, की, भूकमुक्त भारत व अन्न नासाडी शून्यमुक्त भारत घडावा हे ध्येय ठेवून अन्न वाचवा हे अभियान आह्मी राबवित आहोत.अन्नाची बचत ही अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असते. देशात भूकंबळीची संख्या वाढत आहे. अनेकांना एक वेळच ही अन्न मिळत नाही.अश्या परिस्थितीत ताटात अन्न वाया घालवणे उचित नाही.त्यामुळे पुढच्या वेळेस अन्न ताटात उष्टे ठेवायच्या आधी विचार जरूर करा. . प्रत्येक माणूस दोन वेळची भूक भागविण्यासाठी काहीना काही प्रयत्न करत असतो,कारण अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे, आपण अन्न वाचविण्यासाठी प्रयन्त करतो. परंतु नियोजना अभावी लग्न समारंभ वा सार्वजनिक समारंभा बरोबरच घरोघरी ही अन्न वाया जाते.त्याचबरोबर शिल्लक अन्न उकिरडा,उघड्यावर टाकल्याने पर्यावरणाला व आरोग्यासाठी धोका निर्माण होतो.त्यामुळे अन्न वाया घालवू नका.
या वेळी बोलताना  महिला मंडळाच्या संचालिका सौ.सीमा डांगे म्हणाल्या की,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,संलग्न शिराळा तालुका पत्रकार संघ व कोटेश्वर महिला महिला मंडळाने आरोग्य शिबीरे, वृक्षारोपण, आषाढी एकादशीला दिवस रात्र सेवा देणाऱ्या पोलीस बांधव त्याचप्रमाणे वारकऱ्यांना खिचडी वाटप, वंचितांना मोफत  दिवाळी साहित्या बरोबरच फराळ व वाटप, कोरोना काळात जेवण वाटप,रक्षाबंधनाच्या वेळी सीमेवरील सैनिक बांधवांना 1000 हजार राख्या मंडळाच्या महिलांनी स्वतः तयार करून पाठवल्या,महिला भगिनी करिता  हळदी-कुंकू समारंभ,कोरोना योद्धाच्या सन्मानार्थ ,या बरोबरच किशोरी सबलीकरण अंतर्गत मुलींची  मोफत रक्तगट  व हिमोग्लोबिन तपासणी शिबीर औषध वाटप,कोरोना लसीकरण जागृती करण व कॅम्प,आदी बरोबरच गतवर्षी पाणी वाचवा हे अभियान राबविण्यात आले होते.हे सर्व उपक्रम पत्रकार संघ व महिला मंडळाच्या  वतीने  राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी सर्वानी अन्न वाचविण्याची शपथ घेतली.
प्रारंभी स्वागत सौ.सुमन कदम यांनी तर आभार सौ.स्वाती पाटील यांनी मानले.यावेळी युवराज गवळी,माणिक भिंगारडे, जे.आर.पाटील,शरद गुरव आदींसह विद्यार्थी उपस्थिती त होते.

या वेळी मंडळाच्या सदस्या, विद्यालयातील शिक्षक,शिक्षेकतर  कर्मचारी,विद्यार्थी उपस्थितीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!