ताज्या घडामोडी

मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते कुंभारगल्ली येथे रस्त्याच्या दुतर्फा कुंड्या.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा नगरपंचायत मध्ये राबवल्या जाणा-या माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत हरित शहर बनवण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत यंग राजकमल नागराज मंडळ यांच्या वतीने कुंभारगल्ली येथे रस्त्याच्या दुतर्फा कुंड्या ठेवण्यात आल्या. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील यांच्या शुभहस्ते कुंड्या ठेवणेत आल्या.
तसेच नवीन आर.सी.सी.गटर च्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी कुंभार समाज बांधवाच्या वतीने नवीन आर.सी.सी.रोड व्हावा यासाठी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वसंतराव पवार,वैभव कुंभार, संभाजी नलवडे, महेश पोटे, रघुनाथ जाधव, अजित कुंभार, बबन कुंभार, सुधाकर कुंभार, सुहास कुंभार,शिवराज कुंभार, विलास कुंभार, रविंद्र कुंभार, रवी यादव, तानाजी कुंभार, अर्जुन कुंभार, एकनाथ कुंभार , सुभाष कुंभार, अनिल यादव, दिनकर कोतवाल, विशाल कोतवाल, पांडुरंग नाझरे, सचिन यादव, रोहीत कुंभार, रमेश गायकवाड (भाऊमिस्त्री) बाळासाहेब सवाईराम, सुखदेव कुंभार, राजेंद्र कुंभार,दिलीप कुंभार,शामराव कुंभार, विलास खुर्द,बंडा कुंभार, अजय नलवडे व सर्व कुंभार समाज बांधव तसेच मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!