ताज्या घडामोडी

साहित्यिक विलास देवळेकर यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न गौरव पुरस्कार – २०२२ प्रदान

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

मुंबई:- रविवार दि:- १७ जुलै २०२२ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि- ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आयोजित “राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा” मुंबई शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांतील २५ क्षेत्रांतून पुरस्कार साठी निवडलेल्या ३१ मानकऱ्यांना या सोहळ्यात “मानाचा फेटा- मानकरी बॅच- महावस्त्र- गौरवपदक- सन्मानचिन्ह आणि मानपत्र” या स्वरूपात ‘राज्यस्तरीय गुणिजन तसेच गुरु सन्मान पुरस्कार’ थाटात प्रदान करण्यात आले.सुप्रसिद्ध इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जयलक्ष्मी सानिपीना राव या सोहळ्याला ऑनलाईन समारंभाध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. सुप्रसिद्ध कवी आणि जेष्ठ पत्रकार तसेच सुप्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. श्री शामसुंदर महाराज सौन्नर आळंदीकर हे सभारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष निमंत्रित पाहुणे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री जनार्दन कोंडविलकर होते. सुप्रसिद्ध समाजसेविका आणि समुपदेशका सौ. मिनाक्षी गवळी, सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या सौ. मनिषा कदम ह्या मान्यवरांच्या हस्ते विलास देवळेकर यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न गौरव पुरस्कार – २०२२ प्रदान करण्यात आले. वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या गुणिजन संस्थेचा हा “२२व्या वर्षातील पुरस्कार सोहळा” आहे. पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते ! या ब्रीद वाक्यावर कार्यरत हि संस्था “राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि विदेशस्तरीय पुरस्कार उपक्रम” आयोजित करीत असतो. या सोहळ्याचा समारोप तमाम महिला वर्गाने ‘राष्ट्र वंदना’ सादर करुन समारंभाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!