ताज्या घडामोडी

गवळेवाडी शाळेचे आदर्श उपक्रम

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथ शाळा आणि दिव्यदीप सह्याद्री प्रतिष्ठान गवळेवाडी ,,यांच्या संयुक्त सौजन्याने वाचनालय लोकार्पन सोहळा आणि शाळेतील विविध उपक्रमाचे उद्घाटन,,सत्कार समारंभ सोहळा संपन्न
मेणी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथ शाळा गवळेवाडी हि व्दीशिक्षकी शाळा अतिशय दुर्गम भागात आहे,,,परंतु या दोन ,,तीन वर्षात शाळेने शाळेचे
मुख्याध्यापक- अरुण पाटील
उपक्रमशील शिक्षक- प्रकाश सावंत यांनी शाळेत अनेक उपक्रम राबवून शाळेचा गुणवत्ता स्तर वाढविला,,आणि त्याची परिनिती म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका ,,जिल्हास्तरावर व्यक्तिमत्व आणि क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले तसेच प्रज्ञा शोध परिक्षेत राज्यात दोन क्रमांक मिळवून शाळेचा लौकिक वाढविला,,पालकांच्या विश्वासास पात्र ठरल्याने शाळेचा २९ वरुन शाळेचा सध्या चालू शै वर्षात ५३ पट झालेला आहे.
मुख्याध्यापक अरुण पाटील
उपक्रमशील शिक्षक प्रकाश सावंत
यांनी शाळा माॅडेल करण्याच्या दृष्ट्रीने ,,लोकसहभाग वाढविला,,आणि त्यातून बाह्यांग आकर्षित केला.आणि खालील उपक्रम लोकसहभागातून पूर्ण केलेत.आणि त्याचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते झाले.
*लोकसहभागातून खोली दुरुस्ती दिव्यदीप सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळपास १०००००₹(एक लाख ₹)खर्च करुन खोली दुरुस्ती करुन घेतली. दिव्यदीप सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष- रावसाहेब यादव दाजी,,उपाध्यक्ष- हणमंतराव पवार दादा,,संपर्कप्रमुख-महादेव गोळे भाऊ,सचिव- श्रीहरी चिंचोलकर खजिनदार- आण्णासो निकम सर आणि संपूर्ण कमिटी सदस्य यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.

लोकसहभागातून वाचनालय सुरू दिव्यदीप सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळपास ४००००₹(चाळीस हजार₹) ची पुस्तके शाळेस भेट देऊन ,,कदाचित,,जिल्ह्यातील पहिलीच शाळा असेल जिथे लोकसहभागातून विद्यार्थ्यासाठी,,पालकासाठी वाचनालय लोकार्पण केले.लोकसहभागातून शाळेची आकर्षक कमान गवळेवाडी गावचे सुपुत्र ,,सध्या गोवा येथे नामांकित कंपनीत मँनेजर असणारे,, मा हणमंतराव पवार साहेब यांनी त्यांच्या पत्नी कै बबली हणमंत पवार यांचे स्मरणार्थ ,,जवळपास १६५००₹ खर्च करुन शाळेची आकर्षक आणि मजबूत कमान दिली.

*जलकुंभ( टाकी व संरक्षक जाळीसह गवळेवाडी गावचे माजी उपसरपंच,,शा व्य स जेष्ठ सदस्य मा विलास गवळी आण्णा यांनी विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची सोय व्हावी यासाठी सिटेक्स टाकी ,,संरक्षक टाळी सह ,,जवळपास १०५००₹ खर्च करुन दिली.

*येसाबाई उद्यान प्रचिती दूध संघाचे संचालक मा सुरेश चिंचोलकर यांचे भाचे,, मा महेश बबन देसाई भैय्या ,,यांनी लग्नाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध शो ची जवळपास ७०००₹ ची आकर्षक झाडे देऊन “येसाबाई उद्यान” निर्माण केले

*आकर्षक नाविन्यपूर्ण चित्रसृष्टी गावातील विविध मान्यवर,,,नोकरीनिमित्त परगावी असणारे दानशूर व्यक्ती,,कमिटीमधील सदस्य,,पालक यांच्या लोकसहभागातून जवळपास तब्बल ८००००₹(ऐंशी हजार₹) खर्च करुन,,शाळेच्या संरक्षक भिंतीवर आकर्षक ,,कण्हेरी मठाची आठवण होईल अशी नाविन्यपूर्ण चित्रसृष्टी तयार करण्यात आलेली आहे
या वरील सर्व उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले,,
याकामी शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील सर
उपक्रमशील शिक्षक प्रकाश सावंत सर
शा व्य समितीचे अध्यक्ष तानाजी शिंदे,,
विलास गवळी आण्णा, कमिटीमधील सर्व सदस्य ,,दिव्यदीप प्रतिष्ठान,,GPL टीम सदस्य,,गावातील मान्यवर,,दानशूर व्यक्ती,,पालक यांचे सहकार्य मौलाचे लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!