ताज्या घडामोडी

आचार्य डॉ. जगीशचंद्र बोस व्याख्यानमाला…. शास्त्रज्ञांना समजून घेण्याकरिता अशा व्याख्यानमालेची गरज… प्रा. डॉ. संजय बिरादार

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. ५ (प्रतिनिधी)

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आचार्य डॉ. जगीशचंद्र बोस व्याख्यानमाला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शनिवारी (ता.४) रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ते माकणीचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजय बिरादार होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, समन्वयक प्रा. अशोक बावगे, प्रा. डॉ. राम बजगिरे आदींची प्रमुख उपस्थित होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. जगीशचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. डॉ. संजय बिरादार म्हणाले की, डॉ. जगीशचंद्र बोस यांच्या संपूर्ण जीवन कार्यावर प्रकार टाकताना महाविद्यालयामध्ये अशा व्याख्यानमालेतून देशातील थोर शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात्मक कार्य तरुण पिढीला प्रेरणादायी ठरत आहे. डॉ. बोस यांनी केले जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांमध्ये मोलाचे संशोधनात्मक कार्य केले आहे. वनस्पीशास्त्रामध्ये त्यांनी वनस्पतींना संवेदना असतात हे सिद्ध केले आहे. त्यांनी वनस्पतींची वाढ मोजण्याचे यंत्र तयार केले. त्याला क्रेस्कोग्राफी म्हणतात. भौतिशास्त्रात त्यांनी रेडिओ लहरी, रेडिओ स्फटिक व ऑप्टिक्स फायबर वर संशोनात्मक कार्य केले आहे. २० व्या शतकाच्या प्रारंभी त्यांना फादर ऑफ सायन्स म्हणून ओळखले गेले. डॉ. बोस यांनी विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. म्हणून अशा थोर शास्त्रज्ञांना समजून घेण्याकरिता अशा व्याख्यानमालेची गरज असते. कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. अशोक बावगे यांनी करुन दिला. सूत्रसंचलन डॉ. राम बजगिरे तर आभार डॉ. संध्या डांगे यांनी मांडले. बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील पाटील महाविद्यालयात आयोजित डॉ. जगदीशचंद्र बोस व्याख्यानमालेप्रसंगी डॉ. संजय बिराजदार बोलताना डॉ. अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, अशोक बावगे, राम बजगिरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!