आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत, सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय तळेगाव दाभाडे (स्टेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यसंस्कार व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन..

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि गुरुपुत्र आदरणीय नितीनभाऊ मोरे यांच्या प्रयत्नातून बालसंस्कार व युवा प्रबोधन आयोजित केले आहे.

Spread the love

बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग अंतर्गत
सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय तळेगाव दाभाडे (स्टेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यसंस्कार व्यक्तिमत्व विकास आयोजित केले आहे. 

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी ९ डिसेंबर.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने आणि गुरुपुत्र आदरणीय नितीनभाऊ मोरे यांच्या प्रयत्नातून बालसंस्कार व युवा प्रबोधन आयोजित केले आहे.

विभागातर्फे रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी एकदिवसीय मूल्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आज कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. समाजात नीतिमूल्यांची घसरण होत असून युवा पिढी व्यसनांच्या आहारी गेली आहे. वडीलधारी व्यक्ती आणि गुरुजनांबद्दल आदर कमी होत चालला आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि राष्ट्रभक्तीलोप पावत चालली आहे. समाजाची ही विस्कळीत झालेली घड़ी पूर्वपदावर आणण्यासाठी सुसंस्कारित घडविणे काळाची गरज बनली आहे. मुलांवर योग्य वयात सुसंस्कार घडले तरच देशात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर यांच्यासारखे लोकोत्तर युगपुरुष जन्माला येतील, त्याकरिता मुलांवर सर्वप्रथम मूल्यसंस्कार घडले पाहिजेत..
आज हेच पवित्र कार्य अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या देश-विदेशातील पाच हजारांहून अधिक सेवाकेंद्रांच्या माध्यमातून होत आहे.

बालसंस्कार केंद्रांच्या माध्यमातून अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालून मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न केले जातात. मुलांचा बौद्धिक विकासघडावा, त्यांच्यामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना वृद्धिंगत व्हावी नव्या आव्हानांना व ताणतणावांना सामोरे जाताना मन आणि
बुद्धी सक्षम व्हावी, १४ विद्या ६४ कलांचे ज्ञान व्हावे, योगासने, प्राणायाम, आरोग्यशाख, आहारशस्त्र, आत्मसंरक्षण, पर्यावरण या सर्व उपयुक्त शास्त्रांची माहिती मिळावी आणि त्यातून संस्कार संपन्नव आदर्श भावी पिढी
घडावी, याकरिता बालसंस्कार केंद्रामधून मुलांना मूल्यसंस्कारांची शिकवण देऊन त्यांना आदर्श नागरिक म्हणून घडविले जाते.

या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मूल्यसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरात आपल्या विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करावे अशी विनंती.  मा. सुरेश धोत्रे, मा.निखिल भगत,मा.डॉ. वर्षा वाढोकर, मा.कैलास काळे यांनी केली आहे.

१. शिशू संस्कार मार्गदर्शन (पंचेंद्रिय विकास डेमो)
२. सर्वांगीण विकास डेमो (सामाजिक विकास, भावनिक
विकास, मानसिक, विकास, शारीरिक विकास, बौद्धीक विकास)
३. संस्कार कार्ड एक बौद्धीक क्रांती व व्हिजन चार्ट डेमो.
४. बालसंस्कार काळाजी गरज संस्कारातून

अखिल भारतीय श्री स्वामी गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक
१. सेवामार्गाच्या १ ते १८ विभागांचे सर्व स्टॉल२. नक्षत्र वन३. परसबाग ४. शिशू संस्कार५. पारंपरिक वस्तू ६. गायन-वादन कला ७. पालक समस्या समुपदेशन स्टॉल.८. विद्यार्थी व युवक-युवती समुपदेश..

  •  शिबिराचे ठिकाण
    सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय
    नाना भालेराव कॉलनी, तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. मावळ, जि. पुणे- ४१०५०७. | मो.नं.: ८७९३२०२५५१ रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित केले आहे. शिबीराची वेळ  स.८.०० ते दु. ५.०० पर्यंत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!