कृषीवार्तामहाराष्ट्र

समाजसुधारक बहुउद्देशिय सेवा प्रतिष्ठाण व दैनिक ग्लोबल भारत यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी व हिंदी राज्यस्तरीय कथा,काव्य व वृत्त स्पर्धेचे आयोजन.

Spread the love

समाजसुधारक बहुउद्देशिय सेवा प्रतिष्ठाण व दैनिक ग्लोबल भारत यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी व हिंदी
राज्यस्तरीय कथा,काव्य व वृत्त स्पर्धेचे आयोजन.

आवाज न्यूज : औरंगाबाद.  प्रतिनिधी . ५ जानेवारी.

समाजसुधारक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान व दैनिक ग्लोबल भारत औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी हिंदी भाषेत कथा काव्य व वृत्त स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या मध्ये कथा रत्न/ काव्यरत्न /व वृत्तरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी तात्काळ नोंदणी करून पुढील नियम व अटीचे पालन करून साहित्य पाठवावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेचे नियम व अटी
1. कथा व काव्य,स्वलिखीत व अप्रकाशित असावे. कथा काव्य संदर्भात कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी लेखक साहित्यकाची राहील.
2. कथा,काव्य व वृत्त स्पर्धेतील स्पर्धा काला उत्कृष्ठ साहित्याला राज्यस्तरीय कथा रत्न व राज्यस्तरीय काव्य रत्न पुरस्कार व राज्य स्तरीय वृत्तरत्न पुरस्कार देवुन सन्मान करण्यात येणार आहे.
3. कथा व काव्य साठी कोणतीही शब्द मर्यादा नाही.
4. साहित्य तीस दिवसात संयोजक समितीकडे ईमेल द्वारे पाठवावे.
5. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३००/- रुपये शुल्क राहील.


6. संयोजक समितीकडे स्पर्धेतील निवडक कवी,लेखकाचे साहित्य २०० पानी (पुस्तक) कथा संग्रह व काव्य संग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे. त्या पुस्तकाची मुल्य ५००/- रुपये असुन ज्याला तो संग्रह प्रकाशनपुर्व खरेदी करायचा आहे. त्यांना सवलतीच्यादरात ५० टक्केच्या किमंतीमध्ये (२५०/-रु.) देण्यात येईल. व प्रकाशित झाल्यावर ५००/- रुपयांनाच मिळेल.
7. साहित्य वृत्त सोबत आपला पत्रव्यहाराचा पत्ता,फोटो,ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक पाठवावे.
8. निवड झालेल्या पुरस्कारासाठी सर्व सहभागी साहित्यकांना पत्रकारांना निमत्रंण पत्रिका किंवा मोबाईल क्रमांकावर मॅसेज पाठविण्यात येईल
9. पुरस्कार स्विकारण्यासाठी स्वतःच उपस्थित राहायचे आहे. प्रतिनिधीनां पुरस्कार दिला जाणार नाही. नंतर तो पुरस्कार आपल्याला आपल्या पत्यावर कोरीयर ने पाठविण्यात येईल.
10. आपल्याला कथा संग्रह,काव्य संग्रह विकत घेण्याची सक्ती नाही. आपली इच्छा असेल तरच नाव नोंदणी करावी व त्याची किमंत तात्काळ 9403502555 फोन पे वर पाठवावे.
11. वृतरत्न पुरस्कारासाठी सदरील वृत्त विविध वृत्त पत्रात प्रकाशित झालेले असावे. 12 स्पर्धा सहभागी शुल्क फोन पे ने पाठवावे फोन पे नंबर 9403502555 या पाठवावे व यांची पावती 9403502555 या व्हाट्सअप वर पाठवावी
13. सदर साहित्य मराठी व हिंदी भाषेत असावे. साहित्य वृत्त पुढील ईमेलवर globalbharathindi@gmail.com वर पाठवावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!