ताज्या घडामोडी

केंद्रिय विधी व न्याय विभाग राज्यमंत्री,धनगर समाजाचे नेते मा. ना. डॉ. सत्यपालसिंह बघेलसाहेब यांची महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Spread the love

धनगर समजाचे नेते, केंद्रिय विधी व न्याय विभाग राज्यमंत्री मा. ना. डॉ. सत्यपालसिंह बघेलसाहेब यांनी महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री, धनगर समाजाचे राज्याचे नेते मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांची इस्लामपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यानिमित्त केंद्रिय विधी व न्याय विभाग राज्य मंत्री मा. ना. डॉ. सत्यपालसिंह बघेल यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, सरसेनापती यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा तसेच मा. श्री. आण्णासाहेब डांगे यांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचा संच तसेच शाल, फेटा, श्रीफळ, बुके देवून मा. श्री. आण्णासाहेब डांगे व नगरसेवक मा. श्री. विश्वनाथ डांगे (बापू) यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मा. खासदार श्री. संजयकाका पाटील, माजी आमदार मा. श्री. पृथ्वीराज देशमुख, आमदार मा. श्री. गोपिचंद पडळकर, माजी आमदार मा. प्रा. भगवानराव साळूंखे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री सत्यजित देशमुख, नगराध्यक्ष मा. श्री. निशिकांत पाटील, श्री. विक्रमभाऊ पाटील, महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अरूण घोडके, सांगली जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव कचरे, माजी नगरसेवक मा. श्री. अशोकराव देसाई, मल्हार सेनेचे सांगली जिल्हा प्रमुख सुनिल मलगुडे, किसन गावडे, बजरंग कदम, प्रकाश कनप, श्री. बाळासाहेब कोळेकर, चंद्रकांत ताटे, अँड. उमेश कोळेकर, संदीप माने, पांडूरंग वाघमोडे, राजाराम गावडे, रघुनाथ बोते, सुमित पाटील, उमेश गावडे, मंगेश लवटे, विजय कवठेकर, अभिजित रासकर, दत्तात्रय तांदळे, जगन्नाथ भिसे, महादेव वाघमोडे, जयवंत टिबे, गुंडाभाऊ गावडे यांच्यासह अनेक धनगर समाजाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांचा इस्लामपूर चे नगरसेवक मा. श्री. विश्वनाथ डांगे (बापू) यांच्या शुभहस्ते बुके देवून सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!