ताज्या घडामोडी

काणसा वारणा फौंडेशन संस्थापक दिपक पाटील वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम आयोजन..

Spread the love

कोकरुड/वार्ताहर
जन सेवा हिच ईश्वर सेवा माणुन गेली आठ-दहा वर्षे वारणा फौंडेशनच्या माध्यमातून विरळे ता. शाहूवाडी येथील दिपक पाटील यांनी आपल्या परिसरातील लोकांच्यासाठी अनेक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाज उपक्रम राबवुन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आपण समाजाचे काही तरी देणं लागतो याच उदात्त हेतूने महापुरावेळी नुकसान झालेल्या कुटुंबांना मदत केली आहे.कोरोना महामारीच्या प्रसंगीही लोकांना मदत केली आहे. भागातील आयोजित विविध स्पर्धांना बक्षिसे देत असतात. गावातील धार्मिक कार्यक्रमात ही सहकार्य सातत्याने करीत आहेत. यावर्षी आज होत असलेल्या दिपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सोंडोली येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. विरळे येथे प्रसिद्ध ह.भ.प. ईंदोरीकर महाराज यांचे जाहीर किर्तन सेवा होणार आहे. गावामध्ये आरोग्य शिबीराचे ही आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!