क्रीडा व मनोरंजन

इन्स्पास्पायर फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित कुमार व मुली १६ वर्षांखालील खो खो स्पर्धा

Spread the love

मुलींमध्ये शिवनेरी वि. अमर हिंद व ओम साईश्वर वि. वैभव स्पोर्ट्स तर

कुमारांमध्ये ओम साईश्वर वि. विद्यार्थी व श्री समर्थ वि. ओम समर्थ उपांत्य फेरीत लढणार

मुंबई, १५ मे (क्री. प्र.) : मुंबई खो खो संघटनेच्या मान्यतेने इंस्पायर फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित कुमार व मुली १६ वर्षांखालील प्रायोगिक गट खो खो स्पर्धा दिनांक १४ ते १६ मे, २०२२ या कलावधीत ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, बाळ गोविंद दास रोड, माहीम (प.) मुंबई येथे आयोजित केली आहे. आज झालेल्या मुलींच्या उपांत्य पूर्व फेरीच्या पाहिल्या सामन्यात शिवेनेरी सेवा मंडळाने श्री समर्थ व्यायाम मंदिरचा (१४-०१-०१) १४-०२ असा १ डाव १२ गुणांनी पराभव केला. शिवनेरीतर्फे मुस्कान शेखने नाबाद ३:१०, ३:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ खेळाडू बाद केला. भुमी सोलंकीने २:३०, ४:१० मिनिटे संरक्षण केले. जिकरा शेखने आक्रमणात ०२ खेळाडू बाद केले. श्री समर्थ तर्फे तन्वी मोरेने २:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०२ खेळाडू बाद केले. श्रिया नाईकने १:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०२ खेळाडू बाद केले.

मुलींच्या दुसर्‍या उपांत्य पुर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (१४-०१-०१) १४-०२ असा १ डाव व १२ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे कादंबरी तेरवणकरने नाबाद ७:०० मिनिटे संरक्षण केले. निर्मिती परबने ५:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ खेळाडू बाद केला. अथश्री तेरवणकरने नाबाद १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०६ खेळाडू बाद केले. ओम समर्थ तर्फे श्रिया सिंगने १:४० मिनिटे संरक्षण केले. अवनी पाटीलने १:०० मिनिटे संरक्षण केले.

मुलींच्या तिसर्‍या उपांत्य पूर्व फेरीच्या तिसऱ्या सामन्यात अमर हिंद मंडळाने सरस्वती कन्या संघाचा (०२-०१-०१-०१) ०३-०२ असा १ गुण व ५:३० मिनिटे राखून पराभव केला. अमर हिंद तर्फे निधी पेडणेकरने नाबाद ३:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ खेळाडू बाद केला. प्रांजल पाताडेने ३:१०, ३:०० मिनिटे संरक्षण केले. रुद्रा नाटेकरने नाबाद ४:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०२ खेळाडू बाद केले. सरस्वतीतर्फे जान्हवी लोंढेने नाबाद ५:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ खेळाडू बाद केला. मेधा बैकरने २:०० मिनिटे संरक्षण केले.

मुलींच्या चौथ्या उपांत्य पूर्व फेरीच्या चौथ्या सामन्यात वैभव स्पोर्ट्स क्लबने आर्य सेनेचा (०४-०१-०१-०२) ०५-०३ असा ०२ गुणांनी पराभव केला. वैभवतर्फे सलोनी सावंतने ४:३०, १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ खेळाडू बाद केला. धृती राऊळने नाबाद २:३०, ३:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०२ खेळाडू बाद केले. स्पृती चंदूलकरने नाबाद २:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ खेळाडू बाद केला. आर्य सेनेतर्फे भक्ती बोऱ्हाडेने ४:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०३ खेळाडू बाद केले. दुर्वा मोर्डेकरने १:४०, नाबाद २:१० संरक्षण केले.

कुमार गटाच्या उपांत्य पूर्व फेरीच्या पाहिल्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने अमर हिंद मंडळाचा (११-००-०३) ११-०३ असा १ डाव ०८ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे साई टेंबुलकरने नाबाद ७:०० मिनिटे संरक्षण केले. राजेश मंडलने ४:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०५ गडी बाद केले. ओम वाटणेने २:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ गडी बाद केला. अमर हिंदतर्फे विघ्नेश कोरेने २:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ गडी बाद केला. कविश वैद्यने १:३० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ गडी बाद केला.

कुमारांच्या दुसर्‍या उपांत्य पूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात विद्यार्थी क्रिडा केंद्राने वैभव स्पोर्ट्स क्लबचा (०९-०२-०३) ०९-०५ असा १ डाव ०४ गुणांनी पराभव केला. विद्यार्थीतर्फे जनार्दन सावंतने नाबाद १:२०, ३:२० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ०३ गडी बाद केले. अथर्व पालवने ४:००, २:०० मिनिटे संरक्षण केले. अथर्व फाटकने नाबाद १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ गडी बाद केले. वैभवतर्फे निहाल पंडिने १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०२ गडी बाद केला. वेदांत नागवेकरने २:०० मिनिटे संरक्षण केले.

कुमारांच्या तिसर्‍या उपांत्य पूर्व फेरीच्या तिसऱ्या सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिराने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा (०८-०१-०२) ०८-०३ असा १ डाव ०५ गुणांनी पराभव केला. श्री समर्थतर्फे अनिश शिरोडकरने ४:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०३ गडी बाद केले. देवराज पाटीलने नाबाद २:१० मिनिटे संरक्षण केले. मल्हार मालपने आक्रमणात ०२ गडी बाद केले. विद्यार्थीतर्फे मयंक बैकर व रोहित यादव यांनी प्रत्येकी १:४० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात ०१ गडी बाद केला. अथर्व पालवने ४:००, २:०० मिनिटे संरक्षण केले. अथर्व फाटकने नाबाद १:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०१ गडी बाद केले.

कुमारांच्या चौथ्या उपांत्य पूर्व फेरीच्या चौथ्या सामन्यात ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा (०९-०२-०३) ०९-०५ असा १ डाव ०४ गुणांनी पराभव केला. ओम समर्थतर्फे श्रेयस सौंदळकरने ४:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ०६ गडी बाद केले. आशुतोष नागवेकरने नाबाद २:२० मिनिटे संरक्षण आक्रमणात ०१ गडी बाद केला. पार्थ खैरेने १:३०, १:१० मिनिटे संरक्षण केले. सरस्वतीतर्फे दर्पण सुतारने २:२० मिनिटे संरक्षण केले. प्रणय भायजेने आक्रमणात ०३ गडी बाद केले.

या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई खो खो संघटनेचे प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा याच्या हस्ते पार पडले. उद्घाटनाच्या वेळी इंस्पायर फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन चव्हाण, कार्यवाह अमित संत, सदस्य साकेत जेस्ते, विनीत कागडा, निकेत राऊत, प्रसाद कांबळी, प्रथमेश जाधव, तुषार चिखले तसेच मुंबई खो खो संघटनेचे सह कार्यवाह विकास पाटील, सदस्य निलेश परब, प्राची गवंडी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!