ताज्या घडामोडी

कडेगाव तहसीलदार यांच्या खातेनिहाय चौकशी साठी समविचारी पक्षाच्या आंदोलनाला यश…मा. महादेव होवाळ

Spread the love

नेर्ले (ता. वाळवा )

सविस्तर असे की, कडेगाव तालुक्यातील पत्रकार सुरज जगताप यांना वाळू माफिया कडून झालेल्या मारहाण प्रकरणात दोषी असणाऱ्या कडेगाव च्या तहसीलदार सौ. शैलजा पाटील यांची खातेनिहाय चौकशी व कारवाई साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए- आंबेडकर) या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, मा. महादेव होवाळ. जनता क्रांती दलचे प्रदेश उपाध्यक्ष, मा.आकाश सातपुते. शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष, मा. परशुराम माळी. शिवशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष,मा. प्रमोद मांडवे. यांनी एकत्रित समविचारी पक्षाच्या वतीने… जिल्हाधिकारी सांगली यांना दिनांक 28 /2 /2022 रोजी निवेदन देऊन दोषी तहसीलदारांची खातेनिहाय चौकशी व कारवाई व्हावी म्हणून कडेगाव येथे समविचारी पक्षाच्या वतीने दि.01/03/2022 रोजी ” रास्ता रोको आंदोलन ” केले या समविचारी पक्षांच्या मागणी आंदोलनाला यश आले आहे…..
याबाबत जिल्हाधिकारी सांगली यांनी मा.अप्पर जिल्हाधिकारी यांना संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!