ताज्या घडामोडी

मैत्री प्रतिष्ठान मुंबई, आयोजित ‘सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा’ २०२२ स्पर्धेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

Spread the love

विरार (पालघर): गणराया हे अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत, नागरिकांनी एकत्र यावे या उद्देशाने १८९४ साली *लोकमान्य टिळकांनी* सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. गणेशोत्सव म्हणजे आपल्या सर्वांच्या डोळ्या समोर येते ती बाप्पाची छानशी सुंदर मुर्ती, भव्य दिव्य देखावा, मोदक, आणि गणपति बाप्पा मोरया हा जयघोष… हे वातावरण खुप उत्साही आणि आनंदी असते. आपण सर्वजण बाप्पाची खुप मनोभावे पुजा अर्चा करतो. तसेच आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपला बाप्पा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचेल यासाठी प्रयत्न करत असतात.
अशाच उत्साही गणेश भक्तांनी देखाव्यातून सामाजिक संदेश दिले आणि ते सोशल मीडियावर महाराष्ट्राभर पोचवण्याचे छोटेसे कार्य मैत्री प्रतिष्ठानमार्फत केले जाते. यासाठीच दिनांक *३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर ह्या कालावधीत सेल्फी विथ बाप्पा स्पर्धा २०२२* आयोजित करण्यात आली होती यामधे सर्वच भक्तांचे. सेल्फी नावीन्यपूर्ण होते परंतु प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी ठरले ते.
प्रथम क्रमांक – अलिशा भानुशाली (कोल्हापूर) , द्वितीय क्रमांक – अर्चित पाटील (नाशिक), तृतीय क्रमांक – अपर्णा अभय नाईक (नाशिक)
हा उपक्रम पार पाडण्यासाठी उपक्रम प्रमुख म्हणुन राहुल कानसे व विक्रांत पडियार यांनी उत्तम काम केले. तसेच त्यांना साथ लाभली ती मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष दिनू रिकामे सोबत त्यांचे सहकारी प्रभाकर तांबे , सुभाष टेमकर ,रोशन पाडावे, सागर कांबळे , विराज हेमले, मयूर शिंदे, अमोल माली , प्रजेश जाधव, विनोद बोर्ले, अक्षय मोरे, रोहन तोंडलेकर , अनिकेत साटम, सुधीर रिकामे, नितीन शिंदे, कृनाल चव्हाण जितेंद्र कळमकर , यश धुरी, व ईतर सभासदानी आपले उपक्रमास हातभार लावून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!