ताज्या घडामोडी

रविवार २५ सप्टेंबर रोजी दीनदयाळ सूतगिरणीची २७ वी वार्षीक साधारण सभा

Spread the love

येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लि., इस्लामपूर या सूतगिरणीची २७ वी वार्षीक साधारण सभा रविवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता सूतगिरणीच्या कार्यस्थळावर आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी दिली.

सदरच्या वार्षीक साधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सूतगिरणीचे चेअरमन श्री. मारूती नाना कांबळे हे असून यावेळी सूतगिरणीचे संस्थापक, महाराष्ट्राचे माजी जेष्ठ मंत्री मा. श्री. अण्णासाहेब डांगे (आप्पा) हे प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सभासदांकरिता संस्थेच्या कार्यस्थळावर भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, इस्लामपूर एस. टी. बस स्थानकापासून सभासदांची येणे जाणेची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सूतगिरणीच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांनी या वार्षीक साधारण सभेस उपस्थित रहावे असे अवाहन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मा. अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!