ताज्या घडामोडी
चिखली येथील ऊस रोप निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन.
शिराळा प्रतिनिधी / चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक कारखान्यामार्फत कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निरोगी सशक्त, रोगमुक्त ऊस बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कारखान्याच्या नर्सरीमधून हंगाम सन 2022-23 करीता उस रोप निर्मितीस सुरूवात करण्यात आली. त्याचे श्रीफळ फोडून सुरवात कार्यकारी संचालक अमोल पाटील यांचे हस्ते करण्यात आली. या वेळी शेती अधिकारी विठ्ल चव्हाण यांच्यासह सर्व अँग्री ओव्हरसियर, कर्मचारी उपस्थित होते.