ऐतिहासिकपर्यटनमहाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील,मृगगडवर अदनान शफिक खान याचा पाय घसरून अपघात..

गुरुनाथ सर व टीमने गडाच्या पायथ्याशी असलेल्या भेलीव, शिवदुर्ग रेस्कु टीम व किल्ल्यावरील लोकांनी अदनानला केली मदत.

Spread the love

रायगड जिल्ह्यातील,मृगगडवर अदनान शफिक खान याचा पाय घसरून अपघात; गुरुनाथ सर व टीमने गडाच्या पायथ्याशी असलेल्या भेलीव, शिवदुर्ग रेस्कु टीम व किल्ल्यावरील लोकांनी अदनानला केली मदत.

आवाज न्यूज : प्रतिनिधी, १ ऑगष्ट.

रायगड जिल्ह्यातील, सुधागड तालुक्यातील मृगगड हा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षण झालेले आहे. पुर्वी या किल्ल्यावर कोणीही जात नसे आता काही संस्थांनी बरेच काम केले आहे. त्यामुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते. पुर्वी पायवाट नसलेला असा हा किल्ला होता.

अदनान शफिक खान वय वर्षे ३८ हा दोन मित्रांबरोबर मृगगडावर गेला होता. पावसामुळे संपूर्ण किल्लाच निसरडा झाला आहे. दगड गोटे, पायऱ्यावंर शेवाळ आलेले आहे. अशा वेळी थोडा पाय घसरला तरी हात पाय फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते . आणि झालेही असेच अदनान साधारण पाच दहा फूट घसरला व गुडघे, हात , डोके याला जबर मार लागला . अदनान चे वजन १०३ तो स्वतः सांगत होता त्यामुळे त्याला स्वतःला चालणे शक्य नव्हते व उचलून आणणे थोडे अवघड होते.मित्रांनी मदतीसाठी सर्वांना बोलवले पण उचलून खाली घेऊन जाणे शक्य नव्हते. सुनील भाटीया महाबळेश्वर ट्रेकर्स, व ओंकार ओक यांचा फोन आला गुगल लोकशन व फोन नंबर शेअर झाले.

एकदा आम्ही फोन वर बोलून घेतले व ग्रुपमध्ये मेसेज केला. शिवदुर्ग रेस्कु टीम लोणावळा येथून निघून रेस्कु करायला वेळ होणार म्हणून खोपोलीतील टीम बरोबर बोलणे करुन त्यांना तात्काळ पुढे जाण्यासाठी सांगितले स्थानिक लोक अनिल दळवी व बंटी व इतर , सुद्धा मदतीला आले.
खोपोलीतुन अपघातग्रस्तांना मदतीला सामाजिक संस्थेचे गुरुनाथ सर व टीम लगेचच गडाच्या पायथ्याशी असलेल्या भेलीव गावात पोचली व किल्ल्यावर पण गेली त्यांनी व किल्ल्यावरील लोकांनी अदनान ला स्ट्रेचर मध्ये व्यवस्थीत ठेवला व हळूहळू खाली घ्यायला चालू केले तेवढ्यात शिवदुर्ग टिम पोहचली व गुरु सरांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी अदनान ला दगड गोट्यातुन, अरुंद पाऊलवाटेने, निसरड्या वाटेवरून, सौम्य तीव्र चढउताराने अत्यंत काळजीपूर्वक सुखरूप खाली आणले.

वेळोवेळी त्याच्या बरोबर बोलून त्याला धीर देत देऊन खाली आणले .‌खाली आल्यावर त्यांच्या गाडीत बसवून दोन्ही टीम व अदनान हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाले.
शिवदुर्ग मित्र, लोणावळा टीम योगेश उंबरे, योगेश दळवी, राजेंद्र कडु, महेश मसने, सागर कुंभार, प्रवीण देशमुख, सुनिल गायकवाड,अपघातग्रस्ताच्या मदतीला सामाजिक संस्था टीम विजय भोसले, अमोल कदम, विशाल चव्हाण,मोहन पवार,
अमोल ठकेकर, चेतन चौधरी व इतर स्थानिक भेलीव ग्रामस्थ
सर्वांच्या मदतीने एक जीव वाचला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!