ताज्या घडामोडी

शिवशंभू व्याख्याते प्रा. अरूण घोडके यांचा माजी मंत्री, आमदार जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते सत्कार

Spread the love

इस्लामपूर 

येथील सुप्रसिध्द वक्ते, शिव-शंभू व्याख्याते, इतिहास संशोधक प्रा. अरूण घोडके यांनी ३१ वर्षे सातत्याने शिवचरित्राचा व शंभुचरित्राचा केलेला प्रचार आणि प्रसार यांची दखल घेऊन साऊथ कोरिया मधील विश्वविख्यात ‘बुसान क्रिस्चियन युनिव्हर्सिटी फॉर फॉरेन स्टडीज’ यांचे वतिने प्रा. घोडके यांना इतिहासामधील केलेल्या अतुलनिय कामगीरीबद्दल ‘डॉक्टरेट’ हि पदवी उटी (तामीळनाडु) येथे प्रदान करण्यात आली. बुसान युनिव्हर्सीटी ही जर्मन ग्लोबल ॲक्रेडीशन कौंसिल द्वारा मान्यता प्राप्त आहे.

या मिळालेल्या यशाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. जयंतरावजी पाटीलसाहेब यांनी त्यांचा आज कारखाना कार्यस्थळावर सत्कार केला. यावेळी आ. जयंतराव पाटील यांनी प्रा. अरूण घोडके यांनी केलेले कार्य फार अमुल्य आहे, असे गौरवउदगार काढले. प्रा. अरूण घोडके यांनी आ. जयंतराव पाटीलसाहेब यांना ‘रयतधारा’ हे पुस्तक भेट दिले.

यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे संचालक, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. देवराज पाटील (दादा), राजारामबापु सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री.विजय पाटील, प्रा. डॉ. दिपक पाटील, प्रसिद्ध कवी प्रा. प्रदिप पाटील, राजकुमार मदने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!