ताज्या घडामोडी

आई-बाबा विषयावर भव्य राज्यस्तरीय काव्य महोत्सव, चित्रकला – फोटोग्राफी स्पर्धेचे प्रदर्शन आणि आदर्श माता-पिता गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Spread the love

नवोदित तथा प्रस्थापित कवी, चित्रकार आणि छायाचित्रकार यांचेकरिता पुण्यासारख्या अव्वल सांस्कृतिक राजधानीच्या शहरात एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करुन त्यांच्या उत्तमोत्तम प्रतिभाशक्तीस चालना देण्यासाठी गेली २० वर्षे राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध सामाजिक सेवाक्षेत्रांमध्ये अविरत कार्यरत असलेल्या पुणेस्थित विश्वमाता फाऊंडेशन या सेवाभाव संस्थेच्यावतीने जागतिक मातृदिन- पितृदिन आणि कुटुंबदिनाच्या निमित्ताने ‘आई-बाबा’ विषयावर भव्य राज्यस्तरीय काव्य महोत्सव, चित्रकला फोटोग्राफी स्पर्धेचे प्रदर्शन आणि आदर्श माता-पिता गौरव पुरस्कार सोहळा असे उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. कवितांचे सादरीकरण, चित्रकला फोटोग्राफी स्पर्धेतील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात भरविण्यात येणार असून आदर्श माता-पिता गौरव पुरस्कार आणि स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळ बालगंधर्व रंगमंदिराच्या मुख्य सभागृहात होणार आहे.

सदरील उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी, चित्रकार- छायाचित्रकार तसेच होतकरु नागरिकांनी आपल्य प्रवेशिका बुधवार दिनांक २०/०४/२०२२ पर्यंत संस्थेकडे पाठवाव्यात असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी घाडगे यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे केलेले आहे. स्वरचित आणि अप्रकाशित कवितांसाठी १५० कमाल शब्द मर्यादा असून मराठी, हिंदी, इंग्रज भाषेचे माध्यम आहे. चित्रकला आणि फोटोग्राफी स्पर्धेकरिता ए-३ अथवा पोस्टर साईजमधील सजीव सृष्टीतील मातृत्व- पितृत्वाची महती स्पष्ट करणाऱ्या प्रवेशिका

खालील पत्यावर संपर्क साधावा.

शिवाजी घाडगे (संस्थापक अध्यक्ष), विश्वमाता फाऊंडेशन, प्लॅट नं. ११, श्वेता हाईटस, सर्व्हे नं. १२५/अ/२, जुना वारजे जकात नाका, वारजे, पुणे ४११०५८, मोबाईल नं. ९८२२७५३९६९/९७६६३९१०७५.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!