ताज्या घडामोडी

व्हिएससीएची विजयाची मालिका कायम डीएससीए चषक क्रिकेट स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे : विजय शिर्के क्रिकेट अकॅडमी संघाने आशिष क्रिकेट अकॅडमी ऑफ एक्सलन्स संघाचा ९७ धावांनी पराभव करत ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटी आयोजित डीएससीए चषक मर्यादित षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील विजयाची मालिका कायम राखली आहे.
आशिष क्रिकेट अकॅडमी ऑफ एक्सलन्स संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी विजय शिर्के क्रिकेट अकॅडमीला ३६ षटकात १८९ धावांवर रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली. अलकेश पांडेने ५ षटकात ३० धावा देत पाच विकेट्स मिळवल्या. निकेश भारद्वाजने १३ धावांत दोन फलंदाज बाद केले. संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून देताना पृथ्विक पंडीतने ६२ धावा केल्या. सिद्धांत सिंगने ३९ धावांची खेळी केली. गोलंदाजांनी बजावलेल्या चांगल्या कामगिरीनंतर आशिष क्रिकेट अकॅडमी ऑफ एक्सलन्स संघाच्या फलंदाजांनी मात्र सपशेल निराशा केली. रोहन गोल्लरचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विजय शिर्के क्रिकेट अकॅडमीच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्याना ९२ धावांत गुंडाळत संघाची विजयी आगेकूच कायम ठेवली. रोहनने चिवट फलंदाजी करित ४७ धावा बनवल्या. वैभव बनेने २० धावांत ३ आणि ऋग्वेद पवारने ४ धावांत दोन फलंदाज माघारी पाठवले.

संक्षिप्त धावफलक : विजय शिर्के क्रिकेट अकॅडमी : ३६ षटकात सर्वबाद १८९ ( पृथ्विक पंडित ६२, सिध्दांत सिंग ३९, अलकेश पांडे ५-०-३०-५, निकेश चौधरी २-०-११-२) विजयी विरुद्ध आशिष क्रिकेट अकॅडमी ऑफ एक्सलन्स : १९ षटकात सर्वबाद ९२ ( रोहन गोल्लर ४७, वैभव बने ४-०-२०-३, ऋग्वेद पवार १-०-४-२). सामनावीर – पृथ्विक पंडित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!