ताज्या घडामोडी

डालमिया फौंडेशनच्या वतीने शिराळा तालुक्यातील रुग्णांना मोफत पोषण आहार किट वाटप

Spread the love

कोकरुड/ प्रतिनिधी

डालमिया भारत फौंडेशन व डालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवी ता. शिराळा यांच्या वतीने प्रधान मंत्री टी बी मुक्त अभियान अंतर्गत शिराळा तालुक्यातील १०० क्षयरोग रुग्णांना मोफत पोषण आहार किट वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.माधव ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवीचे युनिट हेड संतोष कुंभार म्हणाले कि डालमिया भारत फौंडेशन (सी एस आर ) च्या माध्यमातून अनेक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक विधायक उपक्रम राबविण्यात येत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज तालुक्यातील ६श १०० क्षयरोग रुग्णांना यापुढे ६ महीने मोफत पोषण आहार किट वाटप करणार आहोत. सर्व क्षयरोग रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.माधव ठाकूर म्हणाले की, महाराष्टातील साखर कारखान्या पैकी प्रथमच या दालमिया साखर कारखान्याने हा उपक्रम राबवून जिल्हा क्षयरोग केंद्रास मोठे सहकार्य केले आहे . या कारखान्याचे अगोदरच्या काळात डालमिया भारत फौंडेशन (सी एस आर ) च्या माध्यमातून अनेक शाळेसाठी ई लर्निग , शाळा पेंटींग ,वाडी वस्ती मध्ये सोलर लॅम्प,आरोग्य शिबीर ,शाळेसाठी वॉल कम्पाऊंड , शाळेसाठी संगणक ,गावासाठी सार्वजनिक स्मशान भूमी बांधणे ,क्रीडा साहित्य ,शाळेचे साहित्य स्कुल बॅग ,पुरग्रस्त भागातील गरजूना संसार उपयोगी साहित्य वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत. प्रारंभी डालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवी चे युनिट हेड संतोष कुंभार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर , वाशीम जमादार यांच्या हस्ते क्षयरोग रुग्णांना मोफत पोषण आहार किट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवीचे एच आर मॅनेजर महेश कवचाळे, शिवाजी पाटील, डॉ.वाशीम जमादार , सुनील कांबळे , डॉ भूषण मोरे ,अशोक संकपाळ , सागर भोरे डॉ. व्हि.डी .घुले , जयंत काळे ,सतीश सौदे , पूजा वांगीकर , शरीफा मुजावर तसेच चरण प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व स्टाफ व तालुक्यातील क्षयरोग पेशंट उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!