क्रीडा व मनोरंजन

जय दत्‍तगुरू क्रीडा मंडळ, दादर आयोजित जिल्‍हास्‍तरीय कबड्डी

Spread the love

एस.एस.जी. श्री गणेश, शिवमुद्रा, अशोकची विजयी घोडदौड

क्रीडा प्रतिनिधी बाळ तोरसकर

मुंबई दि. १२ मे (क्री. प्र.), जय दत्‍तगुरू क्रीडा मंडळ, दादर आयोजित जिल्‍हास्‍तरीय ‘’कुमार गट’’ कबड्डी स्पर्धा दत्‍ता राऊळ मैदान, दादर येथे सुरू असून आज दुस-या दिवशी झालेले कबड्डीचे सामने रोमहर्षक ठरले. आज झालेल्या सामन्यात एस.एस.जी. फाऊंडेशनने बालवीर क्रिडा मंडळावर २५-६० असा ३५ गुणांनी एकतर्फी धुव्‍वा उडवला. विजयी संघातर्फे आकाश चौहान याने अष्‍टपैलु खेळाच्‍या जोरावर चढाईत १५ गुण मिळवत विजयात मोठा वाटा उचलला. तसेच पकड करताना वैभव शिंदेने ६ गुण मिळवले. निकेश करकरे याने उत्‍कृष्‍ट चढाई करून संघासाठी १० गुण व दिवेश गवळी याने पकडीमध्‍ये ४ गुण प्राप्‍त करून त्यांना उत्‍कृष्‍ट साथ दिली. पराभूत संघाकडून चढाईत सुशांत जाधवने ५ गुण, ओमकार सुर्वेने ३ गुण मिळवून चांगला खेळ केला.

दुसर्‍या सामन्यात श्री गणेश स्‍पोर्टस क्‍लबने समर्थ स्‍पोर्टस क्‍लबला ४५-१६ असे २९ गुणांनी पराभूत केले. विजयी संघातर्फे तेजस शिंदे याने २१ तर साहिल मोहिते याने १५ गुण मिळवून संघाला विजय प्राप्‍त करण्‍यास मोलाचे योगदान दिले. तर पराभूत संघातर्फे आकाश चौहान याने चढाईत ५ गुण प्राप्‍त केले त्‍यास मयुरेश दळवी याची उत्‍कृष्‍ट साथ लाभली.

तिस-या सामन्‍यात शिवमुद्रा प्रतिष्‍ठानने भवानी माता प्रतिष्‍ठानवर ५८-२४ असा ३४ गुणांनी विजय संपादन केला शिवमुद्रा प्रतिष्‍ठान कडून चढाईत अभिषेक जाधव यांनी १५ गुण व विशाल लाड ११ गुण तर धनंजय कदम याने पकडीत ६ गुण प्राप्‍त केले. भवानी माता प्रतिष्‍ठान या संघातर्फे नितीन दबे याने उत्‍कृष्‍ट खेळ केला.

इतर सामन्‍यात अशोक मंडळाने कासारवाडी सेंटर या संघाचा ५१-२४ असा धुव्‍वा उडवला. विजयी संघातर्फे शशांक मोकल याने अष्‍टपैलु खेळ केला तर पराभूत संघातर्फे विनय पवार याने अष्‍टपैलु खेळ केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!