ताज्या घडामोडी

श्री साई गजानन सेवा मंडळ संचलीत पायीवारी सांगता समारंभ उत्साहात संपन्न

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस् एम पाटील

श्री साई गजानन सेवा मंडळ संचलित पायवारीचा सांगता समारंभ दिनांक 27/ 11/2022 रोजी श्री दिलीपराव प्रतापराव सोनवणे केंद्रप्रमुख राधाकृष्ण नगर येथे उत्साहात पार पडला माऊलींची सजावट केलेली पालखी व पादूका विधिवत पूजन करुन दर्शना साठी ऊंच जागी विराजमान करुन ठेवण्यात आले होते. दिनांक 27/ 10/ 2022 ते 2/11/ 2022 या कालखंडात अमळनेर ते श्री क्षेत्र शेगाव नगरी येथे सालाबादप्रमाणे जाणारी पायी वारी याही वर्षी उत्साहात पार पडली त्या पायी वारीचा सांगता समारंभ अमळनेर येथे उत्साहात संपन्न झाला पायी वारीला सेवा देणारे भावीक यांचा ही यथोचित रित्या सन्मान करण्यात आला पाई वारीचा सांगता समारंभाचे आयोजन सेवेकरी श्री दिलीप प्रतापराव सोनवणे यांनी केलेलं होतं त्या ठिकाणी महा सत्संग करण्यात आला सेवा देणारे दिलीपराव प्रतापराव सोनवणे यांना मंडळाचे वतीने वारीप्रमुख एस एम पाटील आप्पानी व संचालक मंडलाने सन्मानित केले पायीवारी सांगता समारंभ अतिशय उत्साहात पार पडला महिला बघिनिंची विशेष उपस्थिती रहिली सुमारे 500 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सांगता समारंभ यशस्वीतेसाठी गुणवंत पवार, योगेशभाऊ बाग ,तसेच प्रा. आर व्ही पाटील, वाल्मीक मराठे,जितेंद्र बोरसे,गणेश बोढरे, राजेंद्रसिंग पाटील,योगेशभाऊ पाटील, सुभाष साळुंखे राजेंद्र सोनवणे, दीपक दादा, निकम दादा,सैदाणे सर, डहाळे सर, विठ्ठल आप्पा, सोनवणे आप्पा, अशोक ईसे सर, डी ई तात्या व सर्व श्री साई गजानन सेवा मंडळाने परिश्रम घेतले श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव मोहन पाटील यांनी व श्री शिरीष दहाळे ,विठ्ठल पाटील यांनी सर्व दात्यांचे तसेच दिलीपराव सोनवणे यांचे मनःपूर्वक आभार मानलेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!