ताज्या घडामोडी

शिराळा तालुका कामगार परिषदेच्या वतीने कामगार दिनानिमित्त “स्वच्छता दूतांचा” सन्मान

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
कामगार दिनाच्या औचित्याने शिराळा शहरातील स्वच्छता कर्मचा-यांचा शिराळा तालुका कामगार परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कामगार परिषदेचे अध्यक्ष मारुती रोकडे यांनी केले. यावेळी बोलताना प्रा. राजसिंह पाटील यांनी कामगार परिषदेने तळागाळातील कामगारांबद्दल केलेल्या कार्याबद्दल कामगार परिषदेचे कौतुक केले. प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीराम नांगरे- पाटील यांनी सफाई कामगारांना मिळणा-या वैद्यकीय तसेच इतर सेवा सुविधांबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष नितेश यादव यांनी मनोगत व्यक्त केले. कामगार परिषदेने केलेला सन्मान हा ऊर्जा देणारा असल्याचे भावनिक उद्गार सफाई कर्मचा-यांनी काढले.

यावेळी शिराळा तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष राजू कांबळे,सौ.पूनम रोकडे, नाभिक संघटना शिराळा शहर अध्यक्ष जितेश मुळीक, प्रहार संघटना शिराळा शहराध्यक्ष ओमकार पाटील, शिवाजी कडवेकर, गजानन पवार आदी उपस्थित होते. राजू कांबळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!