ताज्या घडामोडी

जायंटस ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी दुसरी युनिट कॉन्फरन्स मीटिंग संपन्न..

Spread the love

जायंट ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी दुसरी युनिट कॉन्फरन्स मीटिंग संपन्न..
शिराळा प्रतिनिधी : जायंट वेल्फेअर चे विशेष समिती सदस्य मा.विलासजी पवार साहेब, युनिट डायरेक्ट जा.वे. फौ.फेड2क चे मा. किरीट पटेल, जायंट सहेली इस्लामपूर च्या माजी अध्यक्ष सौ.प्रतिभा शाह ,सौ संगीता शहा सौ,श्रद्धा कुलकर्णी, डॉ. शिल्पा कुरणे, हिरकणी अध्यक्ष सविता नलावडे या मान्यवरांच्या उपस्थितीत युनिट 5 ची कॉन्फरन्स संपन्न झाली.
सदर मीटिंग साठी इस्लामपूर सहेली,निनाई कोकरुड, क्रांती मांगले, यंग जायंट शिराळा चे सदस्य तसेच जायंट इस्लामपूर चे उपाध्यक्ष नितीन फल्ले,उपस्थित होते.तसेच श्री यशवंत विद्यालय व उच्च माध्यमिक कोकरुड चे माजी प्राचार्य श्री राजीव नलावडे हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मीटिंग कॉल टू ऑर्डर जायंट हिरकणी च्याअध्यक्ष सविता नलावडे यांनी केले. मा.किरीट पटेल सर यांनी दीपप्रज्वलन केले. नंतर सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक सौ.सविता नलावडे यांनी केले .नंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. कार्यवाह मिनिट्स साठी हिरकणी च्या सल्लागार ऍड नेहा सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. ओपनिंग रिमार्क किरीट पटेल यांनी केले. सूत्रसंचालन हिरकणी च्या गौरी साळुंखे यांनी केले.
यावेळी शिराळा हिरकणी, जायंट सहेली इस्लामपूर, निनाई कोकरुड, क्रांती मांगले, यंग जायंट शिराळा या 5 ग्रुप चे अहवाल वाचन केले.
लोकमत चे वार्ताहर श्री .विकास शाहा , दैनिक लोकवारथा चे रणजित चव्हाण यांना हिरकणी ग्रुप शिराळा यांचे कडून सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर पारितोषिक वितरण मान्यवरांचे हस्ते अवॉर्ड चे व सर्टिफिकेट चे वाटप करण्यात आले. त्यानंतर यंग जायंट सहेली चा शपथ विधी घेण्यात आला.युनिट डायरेक्टर किरीट पटेल यांनी शपथ दिली.
प्रमुख पाहुणे ऍड विलास पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. आभार हिरकणी च्या ऍड नेहा सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमानंतर अल्फोपहार करण्यात आला.अशाप्रकारे खूपच सुंदर कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!