ताज्या घडामोडी

उच्च न्यायालयाचे स्वाभिमानी दरवाजे ठोठावणार…..!

Spread the love

कोल्हापूर (वर्षाराणी दुर्गे सरुडकर)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना दिलेला शब्द राज्य सरकारने पाळा नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील आघाडी सरकारमधून बाहेर पडली आहे. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघटना आक्रमक झाली आहे. विविध शेती प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या ऊस दराचा प्रश्न असो किंवा दूध दरवाढीचा प्रश्न असो या प्रश्नावरून संघटना आक्रमक झाली होती या आंदोलनात शेतकरी संघटनेला चांगले यश मिळाले होते शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, हा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चांगलाच लावून धरला आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
शेतकऱ्यांना रात्री वीज देणं हे मानवी हक्काचं उल्लघंन असल्याचे स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना सध्या रात्रीच्या वेळेस वीज देण्यात येत आहे.
ही वीज दिवसा मिळावी अशी वारंवार शेट्टी यांनी मागणी केली आहे. या मुद्यावरुन राजू शेट्टी यांनी आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, राज्यात वीजेची वाढती मागणी आणि कोळशाचा तुटवडा यामुळे संपूर्ण राज्यात भारनियमन सुरु आहे. त्याचे वेळापत्रक देखील राज्य सरकारने जारी केले आहे. या भारनियमनाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यांची उभी पिक करपू लागली असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!