महाराष्ट्र

महानगरपालिकेच्या प्रभाग रचनांचा मुहूर्त लागला ; नगरपालिकेचा केव्हा?

Spread the love

तळेगाव : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आगामी काळात निवडणुका अपेक्षित आहेत. पुणे महापालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना आज अखेर जाहीर झाली. परंतु नगर पालिकेच्या प्रभाग रचनांचा मुहूर्त अजून लागलेला नाही.

राज्यातील अनेक नगरपरिषदांचा कालावधी संपला असला तरी निवडणुका मात्र लांबणीवर पडलेल्या असून अनेक नगरपालिकांवर कार्यकाल संपल्यामुळे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका रखडल्या आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आला असून कोरोनाची लाट ओसरल्यानंतरच निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ही निवडणुकांमध्ये अडसर ठरत आहे.

राज्यातील विविध 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायती साठी निवडणुका नुकत्याच पार पडल्या असे असताना नगरपरिषदेच्या निवडणुकांना विलंब का होत आहे ?असा प्रश्न सर्वसामान्यांसह इच्छुकांना पडला आहे.

राज्य शासनाने नगर परिषदेच्या निवडणुका दोन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होऊन सर्वच प्रभागाची रचना नव्याने करावी लागणार आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचनेकडे सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुकांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परंतु अजूनही प्रभाग रचना न झाल्याने इच्छुक नाराज झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!