ताज्या घडामोडी

खंडाळा येथे गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संचलित माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा येथे गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षी व्यास यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी उपस्थित संस्थेचे संचालक तसेच शाळा समितीचे अध्यक्ष मा. बाळशेठ जोग यांचे पर्यवेक्षक श्री. देशमुख सर यांच्या हस्ते पुष्प देऊन तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत करण्यात आले. प्रशालेतील शिक्षक श्री. धोपट सर,श्री. जंगम सर तसेच श्री. चिले सर यांच्या मार्गदर्शनाखाली इ. ५ वी ब, क, ८वी ब, ९ वी क च्या विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगणारे नृत्य, कविता तसेच भाषण सादर केले. संस्थेचे संचालक श्री. बाळशेठ जोग,पर्यवेक्षक श्री. जयवंत देशमुख सर, प्रशालेतील शिक्षक श्री. अविनाश जाधव सर, श्री. संदिप जंगम सर आणि इ. पाचवीचा विद्यार्थी कु. जोग यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एस्. के. जाधव सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. पोतदार सर, श्री. जगताप सर, श्री. पाटील सर, श्री. सरगर सर,
श्री. सतिश मोहित सर, धोपट सर, चिले सर, देसाई सर, मगर सर, क्रीडाशिक्षिका सावंत मॅडम, बोरकर मॅडम,आंबडारे मॅडम तसेच गावडे मॅडम व खेडेकर मॅडम आणि चावरेबाई तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!