ताज्या घडामोडी

भुसावळ येथे आर.पी.आय आठवले गटाचा प्रवेश सोहळा संपन्न

Spread the love

युवा जळगांव जिल्हा सचिव पदी सुपडू संदानशिव यांची निवड

यावल तालुका प्रतिनिधी फिरोज तडवी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जळगांव जिल्हा अध्यक्ष राजू भाऊ सुर्यवंशी यांच्या अध्यक्ष ते खाली प्रवेश सोहळा संपन्न झाला,यात जळगांव जिल्ह्यातील मुख्य चार पदांची नियुक्ती करण्यात आली आहे,तसेच अनेक नविन पदाधिकऱ्यांच्ची नेमणूक करण्यात आली ,यात युवा जळगांव जिल्हा अध्यक्ष पदी श्रीकांत वानखेडे, युवा जळगांव उप जिल्हाध्यक्ष पदी विक्रम प्रधान,युवा जिल्हा संघटक पदी डॉली वानखेडे तर यावल तालुक्यातील चुंचाळे/ बोराळे येथील अनेक वर्षांपासून सामाजिक संघटने मध्ये कार्यरत असून चुंचाळे फाटा ते चुंचाळे रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन असे अनेक आंदोलने करणारे,अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारे भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी देखील प्रवेश केला असून सदर त्यांची समाजाविषयी तळमळ बघता आर.पी.आय जळगांव जिल्हा अध्यक्ष राजू सुर्यवंशी तसेच नवनियुक्त युवा जळगांव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांनी सुपडू संदानशिव यांना युवा जळगांव जिल्हा सचिव पदी नियुक्त केले आहे.
सदर प्रवेश सोहळा संपन्न होताच संपूर्ण जळगांव जिल्ह्याचे लक्ष आर.पी.आय.आठवले गटाकडे लागले आहे,कारण येणाऱ्या काळात अनेक ठिकाणच्या निवडणुका होण्याची चिन्हे दिसत असून याचा भार नक्कीच जाणवणार आहे, सदर पक्षात सुपडू संदानशिव यांच्या सह अनेक निकट वांतियानी आठवले गटात प्रवेश करून सोबत भुसावळ तालुका व यावल तालुक्यातील शेकडो युवकांनी प्रवेश घेतला असून जोमाने बंड पुकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
माझ्यावर पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे काम तळागाळातील समाजापर्यंत जाऊन जास्तीत जास्त पक्ष बळकट करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करीन व मला दिलेल्या पदास नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करेल, यावल तालुक्यातील व संपूर्ण जळगांव जिल्ह्यातील गोर गरीब,शेतकरी वर्गास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहील तसेच आर.पी.आय आठवले गट बळकट करण्यासाठी तत्पर राहील असे युवा जळगांव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव यांनी पत्रकार यांच्याशी बोलतांना सांगितले ,तसेच सदर प्रवेश सोहळा वेळी यावल तालुक्यातील राजु वानखेडे,शिवाजी गजरे,विनोद सोनवणे,अजहर तडवी,करण ठाकरे,प्रवीण सावळे,किरण तायडे, आदी उपस्थित होते, तर सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू इंगळे यांनी केले तर आभार लहुजी शक्ती सेने चे जिल्हा अध्यक्ष विकास वलकर यांनी मानले. कार्यक्रासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!