ताज्या घडामोडी

भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा अँड. बाळासाहेब तोरस्करांचा केला सत्कार

Spread the love

भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीतर्फे काल ८ मार्च २०२२ रोजी ठाणे येथे “जागतिक महिला दिन” साईबाबा हाॅल , वागळे इस्टेट येथे महिलांच्या अमाप गर्दीत साजरा करण्यात आला. ठाण्यातील विविध भागातून भारतीय मराठा महासंघाच्या झेंड्याखाली एकवटलेल्या महिलांच्या सहभागाने अतिशय जल्लोषात साजरा झालेला हा जागतिक महिला दिन म्हणजे नारीशक्तीच्या ऐक्याचे आणि समन्वयाचे एक उत्तम उदाहरण होते. कार्यक्रमाचा प्रारंभ माता जीजाऊ आणि जयघोष, शिवराय गर्जनेने अतिशय उत्साही आणि प्रसन्न वातावरणात झाला. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब आहेर , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बन्सीदादा डोके , राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब तोरस्कर, श्री. राजेंद्र जगदाळे, श्री. राजन गावंड, श्री. संजय मिरगुडे, श्री. अनिल फोंडेकर आदि राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी तसेच श्री. निलेश देसाई व् श्री. अजय राणे यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
तसेच भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी ठाणे गुणीजन पुरस्कार विजेते श्री. बाळासाहेब तोरस्कर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. बाळासाहेब तोरस्कर यांनी दिलेल्या साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक , राजकीय व फार्मास्युटिकल क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना अलीकडे ठाणे गुणीजन पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले आहे. तोरस्कर हे अनेक सामाजिक , सांस्क्रृतिक व साहित्यिक संस्थांचे संस्थापक व पदाधिकारी आहेत. ते अ.भा.मराठी साहित्य परिषदेचे ठाणे विभागीय अध्यक्ष, राष्ट्रीय शिक्षक संचेतना राष्ट्रीय प्रवक्ता, काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्राचे सल्लागार समिती सदस्य , कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष , जायंट्स ग्रुप आॅफ कोल्हापूर मेट्रोचे अध्यक्ष व अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे जीवन प्रचारक आहेत . ते साहित्य संपदा या दिवाळी अंकाचे निवासी संपादक व कृषिराज दिवाळी अंकाचे सहसंपादक आहेत.
तोरस्कर यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय सामाजिक व साहित्यिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तोरस्कर यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांंना अनेक नामांकित राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत .समाजातील विविध थरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
या कार्यक्रमप्रसंगी सौ. आशादेवी आप्पासाहेब आहेर, सौ मनिषा बन्सी डोके, सौ. सुनंदा राजेंद्र जगदाळे, सौ. भारती राजन गावंड, सौ. बबिता संजय मिरगुडे, सौ. अदिती अजय राणे आदि भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती देखील विशेष निमंत्रित होत्या. त्यांचे शुभहस्ते उपस्थित महिलांना हळदीकुंकू व भेटवस्तू देण्यात आल्या.
सौ. बबिता संजय मिरगुडे यांच्या नेतृत्वाखालील महिला बचत गटांच्या महिलांचा देखील सन्मान याप्रसंगी करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत उत्तम सुनियोजन भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीने केले होते. सौ. श्रेया तटकरे व सौ. प्रविणा सावंत यांच्या नियोजनाखाली अ‍ॅडव्होकेट रचना भालके, सौ. वृषाली काळण, सौ. स्नेहा सावंत सौ. निशा गवळी, सौ. अंजली पाटील, सौ. सानिका कांबळे. सौ. शुभलक्ष्मी प्रसाद, सौ कल्पना मकरे, सौ. रंजना पाटील, कु. शिल्पा संजय मिरगुडे. आदि महिला सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रविणा सावंत यांनी उत्तमरीत्या केले. महासंघाच्या वरिष्ठ सदस्या सौ. नेहाताई यांची तब्येत ठीक नसतांनाही त्यांनी हा कार्यक्रम योग्य रीतीने पार पडावा यासाठी सतत विचारपूस करून सहकार्य केले. तसेच कु. परशुराम आंबेरकर व् अमित यांनीही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
स्थानिक समाजसेवक श्री. गजानन गायकवाड सर यांनीही उपस्थिती दर्शवून आयोजकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!