ताज्या घडामोडी

बाटीया आयोगाने आडनावा वरून ओबीसीचा सर्वे केल्या मुळे ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसींना जागा कमी मिळाल्या : जिल्हा अध्यक्ष सुनिल गुरव

Spread the love

शिराळा तालुका प्रमुख ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

शिराळा प्रतिनिधी

शिराळा येथे ओबीसी व्हिजेएनटी बहुजन परिषद या संघटनेची शिराळा तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची ओबीसी जिल्हा अध्यक्ष सुनिल गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी शिराळा तालुका ओबीसी तालुका अध्यक्ष महादेव माने, संभाजी मोहीते, संघटक रवि यादव, सुभाष कदम प्रमुख उपस्थित होते.यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनिल गुरव म्हणाले की ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षित जागा संख्या कमी झाली आहे. बाटीया आयोगाने आडनावा वरून ओबीसीचा सर्वे केला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसींच्या जागा कमी झाल्या. त्यामुळे ओबीसींना राजकीय क्षेत्रामधील आरक्षण हे पूर्वी प्रमाण मिळायला हावे असे सुनिल गुरव म्हणाले.

तर गणेश यादव म्हणाले की राजकीय व शैक्षणिक सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी ओबीसी समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे म्हटले.यावेळी राजाराम कबाडे , अमोल काटकर, सतिश गुरव, गणेश यादव, वैभव तेली, सुभाष कदम, अजय नलवडे, जगदीश सोळवंडे तसेच ओबीसी बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आभार रवि यादव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!