आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

दिव्यांगांच्या साठी किशोर आवारे देवाप्रमाणे धावून येतात… किशोर कुलकर्णी

दिव्यांग बांधवांच्या कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी किशोर आवारे स्वतः लक्ष घालून समस्येचे निराकरण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत.

Spread the love

दिव्यांगांच्या साठी किशोर आवारे देवाप्रमाणे धावून येतात… किशोर कुलकर्णी.Kishore Awarae runs like God for the disabled… Kishore Kulkarni.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर,१८ एप्रिल.

तळेगाव शहरातील दिव्यांग बांधवांसाठी किशोर आवारे हे नेहमी देवासारखे धावून येतात. दिव्यांग बांधवांच्या कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी किशोर आवारे स्वतः लक्ष घालून समस्येचे निराकरण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. करोना काळात देखील किशोर आवारे यांनी दिव्यांग बांधवांसाठी मूलभूत मदत कार्य केले आहे.

नगर परिषदेच्या मासिक अनुदानातील प्रश्नांमध्ये किशोर आवारे यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे मासिक तीन हजार रुपये अनुदान पुन्हा मिळणार असल्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी ही मोठी मदतच त्यांनी केलेली आहे.

 

किशोर आवारे यांचे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षातील कार्यपट पाहिल्यानंतर असे लक्षात येते की किशोर आवारे हाच खरा जनसेवक असून राजकारणापासून स्वतःला दूर ठेवून गोरगरिबांसाठी सतत कार्य करत राहणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्व दूर ओळख निर्माण झालेली आहे.

नगरपरिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मासिक अनुदानामध्ये किशोर आवारे यांनी केलेली मध्यस्थी अत्यंत महत्त्वाची ठरली असल्यामुळे दिव्यांग बांधवांचा मासिक अनुदानाचा प्रश्न तूर्तास मीटलेला आहे असे दिव्यांग विकास संस्थेचे किशोर कुलकर्णी यांनी जाहीर पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!