महाराष्ट्र

कोरोना साखळी तोडुया पण सामान्य माणूस वाचवूया – आप तर्फे निदर्शने

Spread the love

पुणे : कोरोना लॉकडाउन संदर्भात जून मधील नियमावलीनुसार पुणे मेट्रो शहर व जिल्हा हा वेगवेगळा घटक धरला जाणे अपेक्षित असताना हा पुणे जिल्हा हा एकसंध घटक मानणे योग्य नाही.  लॉकडाउन बाबत सर्व घटकांना परस्पर पूरक बंधने असावीत .दुकानांची वेगवेगळी गटवारी करून वेळ नियोजन करावे. बेकरी, डेअरी ,चहा आदींची वेळ आणि दुकानांची वेळ यामध्ये फरक करावा.संध्याकाळी ७ पर्यंत वेळ असावी.लसीकरण वेग वाढवावा व दुकानदारांवरील केसेस मागे घ्याव्यात. आदी मागण्यांसाठी आज पुण्यात सकाळी सोन्या मारुती चौकात आप तर्फे निदर्शने करण्यात आली.

जनतेला विजबिल सवलत, शाळा फी कपात, असंघटित क्षेत्रास , घर कामगार, सार्वजनिक वाहन चालक यांना किमान पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली गेली असती तर लॉक डाउन चे पालन होण्यासाठी साहाय्य झाले असते. निम्न आर्थिक स्थरातील जनतेस कोणतीच आर्थिक मदत नसल्याने त्याचा मोठा दबाव तयार होतो आहे. व्यापारी, लघु उद्योजक हा त्यातील रोजगार पुरवणारा व आर्थिक साखळी मजबूत ठेवणारा घटक आहे.

काळजी आरोग्याची ,गरज जगण्याची या द्विधा स्थितीत जनतेला साथ न देणाऱ्या सरकारला इशारा आणि दुकानदार,लघु उद्योजक व असंघटित क्षेत्रातील जनतेला पाठिंबा म्हणून आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून ही परस्पर पूरक वेळापत्रकाची मागणी करीत आहे असे आपच्यावतीने सांगण्यात आले.

या निदर्शनात आप चे मुकुंद किर्दत,संदीप सोनवणे,सय्यद एम अली, मनोज थोरात, विक्रम गायकवाड, आनंद अंकुश, सतीश यादव, संदेश दिवेकर, सुभाष करंडे, पीटर डिसूझा, विजय शिंदे, निसार सय्यद, ऋषीकेश मारणे, रविकांत आदरकर,श्रीकांत आचार्य, किरण कांबळे, हनीफ मोमीन,सुरेश पारखी, प्रशांत जगताप आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!