ताज्या घडामोडी

श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेला यंदा २१ लाखाचा नफा     

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. ८ (प्रतिनिधी) : येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची बैठक नूतन इमारतीत शुक्रवारी (ता.८) रोजी शिवशरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या पतसंस्थेचे यंदाचे १२ वे वर्ष असून पतसंस्थेला उत्कृष्ट संस्था चालविल्याबद्ल महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनकडून विभागीय पातळीवर सलग तीन वर्षापासून पुरस्कारांने सन्मानित केले जात आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात या पतसंस्थेस २१ लाख २४ हजार ८३६ रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे. या पतसंस्थेकडे यंदा १ कोटी ७ लाख ६२ हजार २५० रुपयाचे वसुल भाग भांडवल, ७ कोटी १९ लाख १ हजार ३४६ रुपयाच्या ठेवी, संस्थेने ६ कोटी ५८ लाख ३६ हजार २८५ रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणूक २ कोटी ४० लाख ४२ हजार ६९९ रुपये असून या संस्थेचे ३७७५ सभासद आहेत. ऑडीट वर्ग ‘अ ‘ दर्जा प्राप्त असून संपूर्ण संगणकीकृत पतसंस्था आहे. ठेवीवरील आकर्षक व्याजदर योजना यात महालक्ष्मी लखपती योजना, गणेश युवा मंगल योजना, स्वप्नपुर्ती योजना, सरस्वती मासिक प्राप्ती ठेव योजना, महावितरण कंपनीचे वीज बील भरणा केंद्र, मुरुम व उमरगा ११ टक्के सोने तारण कर्ज तर १४ टक्के इतर तारण कर्ज आदी सोयी ग्राहकांच्या फायदयासाठी संस्थेकडून पुरविल्या जातात. या पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरणप्पा मुदकण्णा, सचिव कमलाकर जाधव, संचालक श्रीशैल बिराजदार, अशोक जाधव, अमृत वरनाळे, आनंदराव बिराजदार, शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, कॅशिअर चिदानंद स्वामी, धीरज मुदकण्णा, अमर बाबशेट्टी, प्रशांत काशेट्टे, सचिन कंटेकूरे, संतोष मुदकण्णा, महातंय्या स्वामी, गुंडेराव गुरव आदींसह कर्मचारीवृंद व सभासद यांच्या सहकार्यांने पतसंस्था यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. कोरोनामुळे कर्ज वाटप मंदावले, ठेवीमध्ये वाढ, थकीत कर्जदारांवर कडक कार्यवाही करून वसुली करण्यात येत असल्याचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांनी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!