आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजमहाराष्ट्र

दारुच्या नशेत किरकोळ भांडणातून युवकाच्या डोक्यात दगड  घालून निर्घृण खून.

आरोपींना पोलिसांनी केली अवघ्या तीन तासांतच अटक ..

Spread the love

दारुच्या नशेत किरकोळ भांडणातून युवकाच्या डोक्यात दगड  घालून निर्घृण खून.आरोपींना पोलिसांनी केली तीन तासात अटक ..Heinous murder of a youth by throwing a stone on his head due to a minor quarrel under the influence of alcohol. The accused were arrested by the police within three hours..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २० मार्च.

दारुच्या नशेत किरकोळ भांडणातून युवकाच्या डोक्यात दगड  घालून निर्घृण खून; केल्याची घटना सोमवारी (दि. २० रोजी सकाळी १०  वा.  ब्राम्हणवाडी (साते)  मावळ, येथे उघडकीस आली. आरोपींना पोलिसांनी तीन तासातच अटक केली. खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ. अभिषेक रमाकांत जेवळीकर यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

सौरभ शैलेंद्र मयेकर वय २१ रा. एक्झर्बिया जांभूळ ता. मावळ मूळ वापोले ता. चिपळूण जि. रत्नागिरी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.संकेत शंकर आनंदे .वय २१, सक्षम शंकर आनंदे वय २३, दोघे रा. व्हिजन सिटी जांभूळ ता. मावळ) वओमकार पांडूरंग कदम वय २१ रा. विजयनगर कॉलनी वडगाव मावळ येथील खुनातील  आरोपींना अटक करण्यात आली.

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार कान्हे येथील महिंद्रा सी आय ई कंपनीत काम करणारा सौरभ मयेकर याचा आरोपींच्या “मित्रांनी दारूच्या नशेत किरकोळ भांडणातून आरोपींनी सौरभ मयेकर यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. आरोपी घटना स्थळावरून फरार झाले.

 

खून झाल्याची माहिती मिळताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक विलास भोसले, सहाय्यक फौजदार सुनील मगर, सुनील जावळे, पोलीस हवालदार अमोल कसबेकर, श्रीशल्य कंटोळी, संजय सुपे, आशिष काळे, पोलीस अंमलदार अमोल तावरे, उमाजी मुंढे, सागर गाडेकर, गणपत होले आदींनी घटना स्थळावर पोहचुन. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले.

पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक. विलास भोसले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!