आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ : फरियाज रिसाॅर्ट च्या वतीने हाॅटेल परिसरात स्वच्छता मोहिम..

Spread the love

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ : फरियाज रिसाॅर्ट च्या वतीने हाॅटेल परिसरात स्वच्छता मोहिम..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी १६ जानेवारी.

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा ह्या मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. लोणावळा शहराला देशातील स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगरपरिषदेने शहरातील व्यावसायिक अस्थापना व निवासी सोसायट्यांना आपल्या परिसरात स्वच्छता मोहिमा राबविण्याचे आवाहन केले आहे.

यानुसार लोणावळा शहरातील स्टार गुणवत्ता असलेल्या फरियाज रिसाॅर्ट यांनी हाॅटेल परिसरात रविवारी स्वच्छता मोहिम राबवत संपुर्ण परिसर स्वच्छ केला. या मोहिमेत हाॅटेल व्यवस्थापनातील जागर ठाकूर, सुनिल बांदल मारुती इंगूळकर, पार्थ रे याच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. येणार्‍या काळात देखील लोणावळा शहराला स्वच्छ सुंदर व हरित बनविण्यासाठी व्यवस्थापक शक्य ती मदत करेल असे यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!