क्रीडा व मनोरंजन

अजित सोंडूलकर कराटेत तालुक्यात प्रथम

Spread the love

हाय्यर एज्यूकेशन सोसायटी , शिराळा संचलित आरळा येथील गांधी सेवाधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी अजित रामचंद्र सोंडूलकर यांने शासकीय शालेय तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला .
कोकरूड येथील शिवाजीराव देशमुख क्रीडा संकुल येथे शासकीय शिराळा तालुकास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. १७ वर्ष वयोगटा मध्ये ४० ते ४५ वजनगटात अजित सोंडुलकर याने प्रथम क्रमांक मिळविला. शासकीय जिल्हा क्रीडा संकूल सांगली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी अजितची तालुक्यातून निवड झाली आहे. या यशासाठी त्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एस. घोरपडे , क्रीडाशिक्षक सुधीर बंडगर यांचे मार्गदर्शन लाभले . संस्थेचे सचिव बं. चिं. दिगवडेकर चेअरमन आर . व्ही. हसबनीस , संचालक प्रदिप हसबनीस यांनी तसेच संस्थेचे सर्वं संचालक व पदाधिकारी यांनी त्याचे अभिनंदन केले. डोंगरी भागात राहणाऱ्या अजितच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतूक व अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!