आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

कलापिनी बाल भवन मध्ये ‘स्वनिर्मित’ राखी कार्यशाळा संपन्न. .

बाजारामध्ये अनेक प्रकारच्या राख्या विकत मिळत असल्या तरी स्वनिर्मितीचा आनंद हा वेगळाच असतो .

Spread the love

कलापिनी बाल भवन मध्ये ‘स्वनिर्मित’ राखी कार्यशाळा संपन्न. .

आवाज न्यूजः विश्वास देशपांडे प्रतिनिधी ८ ऑगष्ट.

कलापिनी बाल भवन मध्ये पालक आणि कुमार भवन च्या विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. बाजारामध्ये अनेक प्रकारच्या राख्या विकत मिळत असल्या तरी स्वनिर्मितीचा आनंद हा वेगळाच असतो .आणि म्हणूनच घरातच असलेल्या साहित्यामधून सुंदर आणि आकर्षक राख्या कशा बनवायच्या हे कार्यशाळेत शिकवण्यात आले.

ज्योती ढमाले ,मनीषा शिंदे, वंदना चेरेकर, माधवी एरंडे, विशाखा देशमुख, केतकी लिमये यांनी राख्या स्वतः बनवून दाखवल्या आणि काही राख्या पालकांकडून बनवून घेतल्या.
टिंटेड पेपर, क्विलिंग पेपर, वेलवेट पेपर, लोकर, हेअर बँड अशा अनेक साहित्यांमधून सहज सोप्या स्वनिर्मित राख्या बनवल्याचे समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. कार्यशाळेमध्ये उत्साही पालक, बालभवनचे व कुमार भवनचे विद्यार्थी सहभागी झाले होते.. या कार्यशाळेचे नियोजन अनघा बुरसे आणि मधुवंती रानडे यांनी केले. बाल भवन शिक्षकांनी संपूर्ण सहकार्य केले. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद देणारी ही कार्यशाळा सगळ्यांनाच स्वनिर्मितीचा आनंद देऊन गेली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!