ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते 75 हजार फळझाडांची लागवड

Spread the love

लोहा तालुका प्रतिनिधी संतोष चेऊलवार

दि. 11 – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मौ.कलंबर बु.ता लोहा येथे नुकतेच जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते 75 हजार फळझाड लागवड कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आर.बी.चलवंदे, उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी.सुखदेव, तालुका कृषी अधिकारी घुमनवाड, तसेच कृषी विभागातील इतर कर्मचारी व शेतकरी यांची उपस्थिती होती.
सन 2021 -22 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आंबा, मोसंबी, का.लिंबू, पेरु, चिकू, चिंच, संत्रा , सिताफळ, इक्यादी फळपिकांची लागवड करण्यात येणार आहेत.अमृत महोत्सवा निमित्त 75 अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटीका स्थापन करण्यात येणार आहेत. 75 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करून विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहेत. 75 गटांना बँकेमार्फत औजारे देण्यात येणार आहेत. तसेच जिल्हृयातील विविध ठिकाणी विकेल ते पिकेल या कार्यक्रमांतर्गत 75 शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केद्र स्थापन करण्यात येणार आहेत.या सर्व उपक्रमाची जिल्ह्यात सुरूवात झाली असून 15 ऑगस्ट 2022 पर्यंत हे उपक्रम पूर्ण करण्यात येणार आहेत.असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवंदे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!