ताज्या घडामोडी

श्रीगुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित कार्यक्रमात शालेय पालिका विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचे वाटप!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

मुंबई:- श्रीगुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल टृस्ट तर्फे गोराई पालिका विद्यार्थ्याना उद्योजक संतोष रहाटे यांच्यावतीने वह्या व कंपास बाॅक्स आदी शालोपयोगी वस्तूंचे वाटप माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत, माजी नगरसेविका स्मिता सुभाष सावंत , टृस्टचे विश्वस्त निशाद अमृतराव पाटणकर, उद्योजक संतोष लक्ष्मण रहाटे, समाजसेवक अनंत दाभोळकर,समाजसेवक रमेश खामकर तुकाराम निकम,एटी न्युजचे किशोर यादव,मनोरी आश्रमाचे सेवक संघाचे शैलैश चव्हाण, शेखर परब, बाबाजी पवार, मंगेश बाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी नगरसेवक सुभाष सावंत म्हणाले की मुलांचे लहानपणीचे गुरु हे आई वडील असतात. त्यानंतर शाळेचे शिक्षक असतात. या ठिकाणी मी स्वामी गगनगिरी महाराजांच्या आश्रमात गुरूंचे आशिर्वाद घेण्यासाठी दरवर्षी येत असतो. मुलांनी नेहमीच गुरूंना वंदन केले पाहिजे. उद्योजक संतोष रहाटे म्हणाले की, संस्थेचे विश्वस्त निशाद पाटणकर यांच्या प्रेरणेने मुलांना शालोपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या आश्रमात आल्याने बाबांचे आशिर्वाद मिळाल्याचे खरे समाधान मिळत आहे. मुक्त पत्रकार अनंत दाभोळकर म्हणाले की, बाबांनी विश्व शांती व मानव कल्याण हा उद्देश सांगितलेला आहे. त्याचे पालन करण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातुन करीत असल्याचे विश्वस्त निशाद अमुतराव पाटणकर यांनी सांगितलेले आहे. हे कौतुकास्पद आहे. यावेळी समाजसेवक रमेश खामकर, एटी न्युजचे किशोर यादव, यांचेही समयसूचक मार्गदर्शनपर भाषणे झाली. मनोरी आश्रम ट्रस्ट येथे अखंड नामस्मरण,होमहवन,श्रीगुरुंचे पाद्य पूजन,सहभोजन कार्यक्रम नियमांप्रमाणे करण्यात आले. या गुरूपोर्णिमा सोहळ्यात भक्तांची उपस्थिती उल्लेखनिय होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!