ताज्या घडामोडी

शृंगारतळीत येथे ढेरे बाल रुग्णालयाचा शानदार शुभारंभ

Spread the love

गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या शुभहस्ते झाले उद्घाटन
गुहागर (प्रतिनिधी) : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉ. साल्हे यांच्या क्लिनिकच्या वरील पहिल्या मजल्यावरील सुसज्ज अशा ढेरे बाल रुग्णालयाचे उद्घाटन तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर सुभाष जवळगीकर, डॉ. मुकुंद डबीर उपस्थित होते.
डॉ शशांक ढेरे यांनी एमबीबीएस ( MBBS) चे शिक्षण हे तेरणा मेडिकल कॉलेज नेरूळ नवी मुंबई येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील सुप्रसिद्ध अश्या सायन हॉस्पिटल ( लोकमान्य टिळक मुनिसिपल मेडिकल कॉलेज) येथून बालरोग व नवजात शिशु यांचे पदव्युत्तर पदवी (DCH ) चे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी मुंबई मधील केईम आणि वाडिया चिल्ड्रेन हॉस्पीटल येथे देखील बालरोग व नवजात शिशु विभागामध्ये काम केले आहे. डॉ. ढेरे यांनी मुंबई, पुणे या शहरात न जाता आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील बालकांना मिळावा या उद्देशाने त्यांनी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे बालरोगतज्ञ म्हणून एक वर्ष सेवा स्वीकारली. दरम्यान, गुहागर तालुक्यात एकहि बालरोगतज्ञ व नवजातशिशु तज्ञ नसल्यामुळे गुहागर तालुक्यातील बालकांना चिपळूण , डेरवण, रत्नागिरी अश्या शहराच्या ठिकाणी जावे लागत असे. नागरिकांची होणारी अडचण, मानसिक व आर्थिक त्रास यापासून सुटका व्हावी, या सेवाभाव वृत्तीने गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळी बाजारपेठ या ठिकाणी सुसज्ज असे ढेरे बालरुग्णालय ( लहान मुलांचे हॉस्पिटल) सुरू केले आहे. या रुग्णालयमध्ये जन्मजात बालकापासून ते १८ वर्षे वयापर्यंत सर्व बालकांवर सर्व प्रकारच्या आजारावर उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे. नवजातशिशु मधील विविध आजार , कमी वजनाची तसेच कमी दिवसांची अर्भके यांना लागणारे काचपेटी ( रेडियेंट वार्मर / इन्कुबेटर ) याची सोय या रुग्णालयात उपलब्ध केली आहे. तसेच नवजात बालकांचे विविध आजार, आजार यावर उपचार आणि मार्गदर्शन, लहान मुलांचे साथीचे आजार, आकडी, झटके, जन्मजात हृदयरोग, लहान मुलाचे श्वसनाचे आजार, बालदमा ( अस्थमा )यासाठी वाफ देण्याची (नेबुलायझेर थेरपी ) सोय तसेच बालकांचे कुपोषण वजन न वाढणे, गतिमंद, मतिमंद बालके यावर उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच नवजात बालकांसाठी रेडिएंट वॉर्मर / इन्कुबेटर आणि कावीळ कमी करण्याची मशीन ( LED फोटोथेरपी) ह्या सुविधा तालुक्यात सर्वप्रथम डॉ. शशांक ढेरे यांनी ढेरे बालरुग्णालयात उपलब्ध करून दिल्या आहेत.
या उद्घाटन कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निखिल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, गुहागर मेडिकल असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॉ. संदीप जाधव व सदस्य, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. सुरेश भाले, काँग्रेसचे अध्यक्ष रियाज ठाकूर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर कॅनरा बँकेचे श्री. जाधव आदिंसह अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहुन डॉ.ढेरे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. बाळासाहेब ढेरे, डॉ. निलेश ढेरे, डॉ. गीतांजली ढेरे, डॉ. ऋषिकेश ढेरे, प्रा. निवृत्ती ढेरे, सौ. शोभा ढेरे, सौ. मीना ढेरे, सुजाता गुरव, प्रवीण सावंत आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!