ताज्या घडामोडी

सामाजिक कार्यकर्त्या जोशीलाताई पगारिया यांचा नाशिक येथे विशेष सन्मान!

Spread the love

प्रतिनिधी-लक्ष्मण राजे

साक्री :- अखिल भारतीय भष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानव अधिकार सामाजिक न्याय चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा पाटील खंडारपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यात “विभागीय मेळावा” तसेच “गुरुपौर्णिमा’ निमित्ताने नाशिक येथे डॉ बाबासाहेब आबेडकर सभागृह सातपुर या ठिकाणी विभागीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये समाजात निस्वार्थपणे लोकांच्या अडचणी सोडत असल्याने समाज सेवा करणाऱ्या चार महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला, त्या मध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बुलंद तोफ कर्तुत्वान नारी शक्ति गोरगरीबांच्या कैवारी सर्वांच्या सूख दु:खात धावून जाणाऱ्या अश्या अखिल भारतीय भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या धुळे जिल्हा अध्यक्षा सौ.जोशीलाताई अमर पगारिया यांचा प्रथम सन्मान नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा पाटील खंडारपूरकर यांच्या शुभहस्ते हार ,शॉल व डोक्यावर ताज घालून करण्यात आला, यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आवाज करून, जल्लोष करुन जोशीला पगारिया यांचे अभिनंदन केले, ताईचां सन्मान बघून आम्हाला ही अभिमान वाटले कारण खऱ्या व्यक्तिची पारख अखिल भारतीय भष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमाने करण्यात आली याचा अभिमान वाटला, नाशिक चे जिल्हा अध्यक्ष श्री भिवानंद काळे यांनी देखील जोशीला ताई पगरिया यांचा सत्कार केला. या मेळाव्यानिमित्ताने समस्त नारी शक्तिच्या कार्याचा गौरव समिती चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांनी केला, या मेळाव्यात नाशिक येथील पोलिस निरीक्षक श्री महेंद्र चव्हाण,यांनी सुद्धा भेट दिली तेव्हा महिला होणारे अन्याय, अत्याचार, यावर त्यानी चांगले मार्गदर्शन केले, तसेच महाराष्ट्र प्रदेश विधी अध्यक्ष अँड.श्री विजय पवार यांनी देखील महिलांच्या समस्या बाबत योग्य मार्गदर्शन केले.तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी कसे आवाज उठवावे आदि वर योग्य मार्गदर्शन व सूचना केल्या, तसेच या समिती चे राष्ट्रीय समनव्यक श्री गिरिराज महीरे व लघु व उद्योग आघाडीचे विभागीय अध्यक्ष दिपक मंडलिक यांनी सर्वाना समिती चे नियम व कार्यपद्धती बाबत योग्य मार्गदर्शन केले, या मेळाव्यात विभागांतील जळगांव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर नाशिक तसेंच तालुक्यातील अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव,तसेंच ईतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेठ तालुका अध्यक्ष भास्कर हडस, पेठ तालुका अध्यक्ष कमल ताई भोये, उपाध्यक्ष विष्णू शिंदे, महिला उपाध्यक्ष विद्या ताई भोये, तिळभाट अध्यक्ष जनार्दन तुंबडे, तिळभाट महिला अध्यक्ष प्रतिभा ताई बोरसे, शिंदे अध्यक्ष रंजना गवळी, चौधरी ताई तसेंच पेठ तालुक्यातील ईतर पदाधिकारी, येवला तालुका अध्यक्ष हितेश दाभाडे, उपाध्यक्ष निर्मला ताई गुलहे, नांदगाव तालुका अध्यक्ष संदीप पवार , मनमाड तालुका अध्यक्ष अजय पगारे, सिन्नर तालुका अध्यक्ष किरण चवले, निफाड अस्लम शेख, दिंडोरी तालुका अध्यक्ष श्याम गवारे, कळवण,देवळ, सटाणा, शिर्डी ,राहता ,धुळे ,साक्री अध्यक्ष साहेबराव कारंडे अश्या विविध शहरातील पदाधिकाऱ्यांनी पाऊस असून ही आपली उपस्थिती दाखवली ती पन बाबांच्या प्रेमापोटी आणि नाशिकरांच्या विनंतीला मान देवून असे म्हणायला वावग ठरू नये,
सत्कारमूर्ति साक्री येथील सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ.जोशीला पगारिया ,लातूर येथील समिती च्या पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा.अँड राणीताई स्वामी, मा .सोनाली ताई गुलभिळे यांचा नाशिक समिती तर्फे सन्मान करण्यात आला, या सर्व सन्मानित महिलांना दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून, मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!