ताज्या घडामोडी

वरवडे खारवीवाडा येथे मुलापाठोपाठ आईचेही दु:खद निधन झाल्याने परिसरात शोककळा

Spread the love

जाकादेवी/वार्ताहर

रत्नागिरी तालुक्यातील खारवीवाडा येथील अनुज तुळशीदास पालशेतकर या ९ वर्षीय बालकाचे मंगळवार दि ८ रोजी दुःखद निधन झाले,तर याच मुलाची आई सुजाता तुळशीदास पालशेतकर यांचेही दि.११ रोजी दुपारी दु:खद निधन झाल्याने पालशेतकर कुटुंबासह वरवडे परिसरात शोककळा पसरली आहे.
अनुज पालशेतकर हा अतिशय जिज्ञासू चुणचुणीत मुलगा होता. इयत्ता ४ थी वर्गात तो शिकत होता.वरवडे हायस्कूलचे शिक्षक रामदास पालशेतकर यांचा तो पुतण्या होय. प्राथमिक शाळेत अनुज सर्व उपक्रमांमध्ये तो अग्रक्रमाने सहभाग घेत असे.हसत्या खेळत्या बालवयात अनुज या बालकाच्या दुर्दैवी निधनामुळे वरवडे खारवीवाडासह वरवडे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत असतानाच या मुलाच्या आईचेही दु:खद निधन झाल्याची बातमी कळताच परिसर शोकाकूल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!