ताज्या घडामोडी

विद्यार्थी बनले एक दिवसाचे शिक्षक प्रतिभा शाळेत स्वयंशासन दिन व निरोप समारंभ

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. १४ (प्रतिनिधी)

येथील प्रतिभा निकेतन शाळेतील दहावी वर्गात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी बनले एक दिवसासाठी शिक्षक. प्रतिभा निकेतन विद्यालयात स्वयंशासन दिन व निरोप समारंभ मंगळवारी (ता. १४) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे एक प्रतिक असते. मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवशीय अनुभव व आनंद वाढविणारा असतो. स्वयंशासनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती व्हावी यासाठी असे उपक्रम राबविले जातात. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी शाळा भरवली. शाळेतील विविध वर्गातील अद्यापनासाठी इयत्ता १० वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका निभावत हिंदी, गणित, इंग्रजी, मराठी, विज्ञान, चित्रकला विषयांसह विद्यार्थ्यांना धडे शिकवण्यात आले. गुणवत्तेच्या आधारावर प्रीती कदम मुख्यध्यापिका, युवराज राठोड उपमुख्यध्यापक तर पर्यवेक्षक पार्थ धुमुरे, सुरज चव्हाण, स्नेहल स्वामी, समर्थ घुगरे यांनी स्वयंशासन दिनानिमित्त दिवसभरातील शाळेचे कामकाज पाहिले. यावेळी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रविण गायकवाड यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. दुपारच्या सत्रात निरोप समारंभ पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका महानंदा रोडगे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यध्यापक उल्हास घुरघुरे, चंद्रमप्पा कंटे, राधाकृष्ण कोंडारे आदींची उपस्थिती होती. यावेळी स्वयंशासन दिनाचे मुख्यध्यापिका, उपमुख्यध्यापक, पर्यवेक्षक, पालक प्रेमदास चव्हाण, दिलीप चव्हाण यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इयत्ता ९ वी वर्गाच्या विद्यार्थिनी संस्कृती राजपूत, साक्षी कारभारी, राजनंदिनी चव्हाण, प्रणिता सगर यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी स्वयंशासन दिनाच्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रमुख अतिथीचा सत्कार करण्यात आला. इयत्ता १० वी वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला कपाट, घड्याळ, साऊंड सिस्टम भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी दहावी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना कँट दाटून आला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना मुख्यध्यापिका रोडगे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख अतिथी उपमुख्यध्यापक उल्हास घुरघुरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहशिक्षक इरफान मुजावर यांनी निरोप गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता सगर यांनी केले. सूत्रसंचालन समृद्धी घुगे तर आभार श्रष्टी व्हनाजे यांनी मानले. सहशिक्षक प्रसन्नकुमार बिराजदार, रवींद्र सुरवसे, संतोषकुमार सूर्यवंशी, सुरेश कांबळे, हेमंत आकुसकर आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!