आरोग्य व शिक्षणकृषीवार्तामहाराष्ट्र

जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस सोहळा संपन्न..

जैन इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून विज्ञान आणि कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love

जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस सोहळा संपन्न..National Science Day celebration at Jain English School Talegaon Dabhade..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे:, वार्ताहर. २ फेब्रुवारी.

जैन इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून विज्ञान आणि कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक , सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी उपस्थित होते.

प्लास्टिकचा वापर टाळा. निसर्ग वाचवा. तरच विज्ञान टिकेल’असा महत्वपूर्ण संदेश विजयकुमार सरनाईक यांनी विद्यार्थी ,उपस्थित पालक आणि शिक्षकांना दिला. तसेच प्रत्येक मुलाच्या जिज्ञासू वृत्तीला वाव द्या, प्रेरणा द्या असे आवाहन याप्रसंगी प्रमुख अतिथींनी केले. विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शाळेचे चेअरमन प्रकाश ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. तसेच प्रमुख अतिथींचे स्वागत व परिचय करून दिला.
विद्यार्थी प्रतिनिधी स्वराज बागायतकर याने विज्ञान दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘अंधानुकरण कब तक’या पथनाट्यातून आपली संस्कृती परंपरा विज्ञाननिष्ठा, देश टिकवण्याची जबाबदारी आपणच पूर्ण करण्याचा मोलाचा संदेश दिला.
शाळेतील पूर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील एकूण ४०० विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून विविध विज्ञान प्रकल्पांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध कलांचे सादरीकरण हे आजच्या कलादालन विभागाचे आकर्षण बिंदू ठरले.

याप्रसंगी संस्थेचे शालेय समिती पदाधिकारी दिलीप पारेख, किरण परळीकर, दिलीप वाडेकर, राकेश ओसवाल, रिकबचंद गुंदेशा तसेच बहुसंख्य पालक वर्ग आणि तळेगावातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तीनही विभागाच्या मुख्याध्यापिका विजया शिंदे, अपूर्वा टकले, शुभांगी भोईर यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कविता फाकटकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!