ताज्या घडामोडी

सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या रक्तदान शिबिरात २०८ दात्यांचे रक्तदान

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.१२
सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पुर्व विभाग आयोजित रक्तदान शिबिर स्व. नामदेव भाऊ पाटील सभागृह नागझरी व उपकेंद्र जुनी मराठी शाळा नावझे येथे एकुण २०८ रक्तदात्यांनी रक्तदान करून संपन्न झाले.
या वेळी मंडळाने प्रथमच दोन केंद्रावर रक्तदान कार्यक्रम घेतला. त्यामध्ये नागझरी येथे एकुण ११९ रक्तदात्यांनी तर नावझे येथे एकुण ८९ रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये नागझरी येथे २, तर नावझे येथे २ महिलांनी रक्तदान केले. या महिलांचे समाजातुन विशेष कौतुक करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सोगले होते.कार्यक्रमाचे उद्घाटक टॅक्स कन्सल्टंट आशुतोष सुदाम अधिकारी नागझरी, उद्योजक सचिन पांडुरंग पाटील, प्रमुख पाहुणे उद्योजक रोशन प्रकाश गायकवाड सिव्हिल इंजिनिअर हे होते. तर उपकेंद्र नावझे येथे उद्घाटक अदानी इलेक्ट्रिसिटी चे पर्यवेक्षक प्रमोद गजानन भोईर हे होते. उपकेंद्र नावझे येथे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नावझे व ग्रामस्थ नावझे यांचे विशेष सहकार्य लाभले. या रक्तदान शाबिराला समाजातील युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
२०८ रक्तदात्यांनी रक्तदान करून आतापर्यंतचा रक्ततदानाचा नवा उच्चांक गाठला आहे.
मंडळाचे विश्वस्त सुनिल शेलार, चंद्रशेखर नाईक, आद्यसंस्थापक चिंतामण पाटील, आजी माजी पदाधिकारी, कार्यकारिणी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव कल्पेश पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!