ताज्या घडामोडी

शिबीरामुळे मुलांची कौशल्ये विकसित होतात: ऑल इंडिया चॅम्पियन आनंदराव धुमाळ

Spread the love

कोकरूड/ वार्ताहर
उन्हाळी शिबिरांमधून मुलांची विविध कौशल्ये विकसित होतात असे प्रतिपादन ऑल इंडिया चॅंपियन व एन. आय. एस. कुस्ती कोच आनंदराव धुमाळ यांनी केले. ते तुरुकवाडी ता. शाहुवाडी येथे दत्तसेवा विद्यालयात दत्तसेवा करियर ॲकॅडमी व कुस्ती हेच जिवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थापक आनंदराव माईंगडे, उपमहराष्ट् केसरी संपतराव जाधव, सरपंच गणपती कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना धुमाळ पुढे म्हणाले की, जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या कुस्तीत ग्रामीण भागातील मल्लांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. गरीब घरातील अनेक मल्लांना कुस्तीने उच्च पदस्त नोकरी मिळवून दिली आहे. ग्रामीण भागातील निवोदित मल्लांना कुस्तीतील राष्ट्रीय स्तरावरील नियमांची माहिती व्हावी. कुस्ती मध्ये कसे प्रावीण्य मिळवता येईल यासाठी होत असलेल्या शिबीरामुळे ग्रामीण भागातील मल्लांची प्रगती होणार आहे. या कार्यक्रमास एन. आय एस. कोच संदीप दळवी, वस्ताद दिनकर पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र साळुंखे, कुस्ती हेच जिवण चे पदाधिकारी शरद जाधव, संपत पाटील, मनोज मस्के, लक्षमण पाटील, अशोक पाटील, प्रमोद पाटील, मुख्याध्यापक गणेश पाटील आदींसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी: कुस्ती खेळाडूंना मार्गदर्शन करताना आनंदराव धुमाळ शेजारी आनंदराव माईंगडे, संपतराव जाधव व अण्य( छाया प्रतापराव शिंदे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!