ताज्या घडामोडी

महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या सांगोला तालुकाध्यक्षपदी डॉ. नाना हालंगडे

Spread the love

उपाध्यक्षपदी रवीकिरण साबळे, सचिवपदी उमेश मंडले, कोषाध्यक्षपदी गणेश कपडेकर यांची निवड

सांगोला/ प्रतिनिधी

डिजिटल पत्रकारांची महाराष्ट्रातील एकमेव स्व-नियामक संस्था (सेल्फ रेग्युलेटरी बॉडी) असलेल्या महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी रवीकिरण साबळे व विनोद उबाळे, सचिवपदी उमेश मंडले, कोषाध्यक्षपदी गणेश कपडेकर यांची निवड करण्यात आली. महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब मागाडे यांच्या उपस्थितीत हर्षदा लॉन्स येथे रविवारी ही बैठक पार पडली.

महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे संस्थापक ॲड. अद्वैत चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष दत्तराव नाईकनवरे, कार्याध्यक्ष विनायक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना राज्यात मोठ्या ताकदीने, सूत्रबद्धपणे डिजिटल पत्रकारांसाठी काम करीत आहे.

सोलापूर जिल्ह्यातही ह्या संघटनेचे संघटन बांधणीचे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे. नुकतीच सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. बाळासाहेब मागाडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संघटन बांधणी करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात सांगोला तालुक्यातून करण्यात आली.

या बैठकीच्या प्रारंभी महा डिजिटल मीडिया असोसिएशनची उद्दिष्ट्ये, अजेंडा याबाबत जिल्हाध्यक्ष डॉ. मागाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तालुकाध्यक्ष व इतर पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांबाबत चर्चा करून बहुमताने निवड करण्यात आली. सांगोला तालुकाध्यक्षपदी पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी रवी साबळे व विनोद उबाळे, सचिवपदी उमेश मंडले, कोषाध्यक्षपदी गणेश कपडेकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून पत्रकार प्रा. कैलास गोरे, मोहसीन मुलाणी, नवनाथ मदने, अशोक बनसोडे – माळी, संतोष साठे, अमोल महारनवर, रोहित सुर्यागण, सचिन गायकवाड, नितीन होवाळ, सचिन धांडोरे, सनी बिचुकले यांची निवड करण्यात आली. निवडण्यात आलेले सर्व पदाधिकारी हे विविध न्यूज पोर्टलचे संपादक, पत्रकार आहेत.

डॉ. नाना हालंगडे हे मागील 18 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी दैनिक सुराज्य, दैनिक पुढारी, दैनिक दिव्य मराठी यासह अन्य दैनिकात काम केले आहे. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली असून तालुक्यात परखड बातमीदार म्हणून त्यांची ओळख आहे. सरकार दरबारी सत्याची बाजू लावून धरून त्यांनी सर्वसामान्यांची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावलेली आहेत. त्यांच्या या बातमीदारीमुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. अशा यासर्व बाबीमुळे त्यांची सांगोला तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.

निवडीनंतर सर्वांचा सत्कार करण्यात आला. महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या सर्व धोरणांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!