ताज्या घडामोडी

यंग जायंटसने सामाजिक समस्यांवर जनजागृती सुरू करावी. भूषण शहा यांचे प्रतिपादन…

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
गुरुवार दिनांक २ जून २०२२ रोजी शिराळा येथे यंग जायंटसच्या शपथविधी समारंभात ते बोलत होते.
यंग जायंटस शिराळा यांचा द्वितीय शपथविधी मध्ये नूतन अध्यक्ष व कार्यकारणी मंडळ यांचा शपथविधी व पद्ग्रहान समारंभ पार पडला.
मिटिंग कॉल टू ऑर्डर नंतर मुख्या अतिथी मा. भूषण शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. हिरकणी ग्रुपच्या सौ. प्रज्ञा चरणकर यांनी जायंट्सची प्रार्थना सादर केली. मान्यवरांचे स्वागत विशाल खुर्द, ओंकार पाटील, हर्षवर्धन नांगरे यांच्या मार्फत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल खुर्द यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सौ. मनीषा यादव यांनी केले. भूषण शहा व किरीट पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. कायकर्माचे आभार हर्षवर्धन नांगरे यांनी केले.
2022-23 या वर्षां साठी *अध्यक्ष म्हणून मा. विशाल खुर्द* यांची निवड करण्यात आली . तसेच उपाध्यक्ष पदी मा. स्वरूप पाटील, मा. अक्षय सटाले ,कार्यवाह मा. दर्शन इंगवले, खजिनदार पदी मा. अनिरुद्ध इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. “यंग जायंट्स ऑफ शिराळा प्राईड” ने गतवर्षी पेक्षा नवीन 9 सदस्य यांची वाढ करून सध्याची सदस्य संख्या 24 इतकी आहे.
जायंट्स वेल्फेर फौंडेशन 2 क पी.आर.ओ मा. भूषणजी शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच जायंट्स वेल्फेर फौंडेशन 2 क युनिट डायरेक्टर मा. किरीट जी पटेल यांच्या शुभ हस्ते शपथ विधी संपन्न झाला. सदर कार्यक्रमास विशेष उपस्थित जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेलीच्या अध्यक्षा सौ. चारुशीला फल्ले, माजी अध्यक्षा सौ. श्रद्धा कुलकर्णी , शिराळा हिरकणी च्या अध्यक्षा डॉ. सौ. सविता नलवडे, मा. अध्यक्षा. डॉ. सौ. शिल्पा कुरणे तसेच जायंट्स ग्रुप ऑफ हिरकणी आणि यंग जायंट्स ऑफ शिराळा प्राईड चे सर्व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!