ताज्या घडामोडी

वाईन विक्री निर्णय रद्द करा – भारतीय जनसंसद चे तहसिलदारांना निवेदन

Spread the love

महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट व किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भावी पिढिचे नुकसान करणारा असुन तो तातडीने रद्द करावा अन्यथा दि. १४ पासुन तहसिल समोर आंदोलन करण्यत येईल अशा आशयाचे निवेदन नेवासा तहसिलदार यांना भारतीय जनसंसद च्या कार्यकर्त्यांनी दिले.
निवेदन देताना भारतीय जन संसदचे रामराव भदगले , कारभारी गरड ,प्रा. नानासाहेब खराडे , डा.अशोकराव ढगे ,डॉ. करणसिंह घुले , अॕड, अजय रिंधे ,डाॕ. विद्या कोलते, कल्याणराव मुरुमकर ,संजय वाघमारे , भैरवनाथ शेजुळ , रंगनाथ डुकरे , हरीश चक्रनारायण , रावसाहेब साठे , बाळू डोंगरे , बाबासाहेब कणगरे , शिवाजी भारस्कर व कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्य शासन शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत निर्णय घेतल्याचे म्हणत असले तरी यातुन किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे हा प्रश्नच आहे. काही शेतकऱ्यांना लाभ मिळेलही परंतु किराणा दुकान , सुपर मार्केट मध्ये वाईन मिळु लागल्यास शालेय मुले , युवक , तरुण , महाविद्यालयातील मुले , मुली वाईनच्या आहारी जातील .त्यामुळे आर्थिक , शारीरीक सामाजिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊन पिढि बरबाद होऊ शकते. म्हणुन राज्य सरकारने तातडीने किराणा दुकान व सुपर मार्केट मधुन वाईन विक्रीचा निर्णय रद्द करावा. तसे न झाल्यास ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे दि. १४ पासुन करत असलेल्या आंदोलनास पाठिंबा व शासनाचा निषेध म्हणुन तालुक्यात आंदोलन करण्यात येईल .
खरे तर जनहित साधण्या ऐवजी नुकसान होण्यास प्रवृत्त करणारा हा निर्णय असल्याने तो तातडीने रद्द करावा , असेही निवेदनात म्हटले आहे.
राज्य सरकारने किराणा दुकान व सुपरमार्केट मधून वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय रद्द करावा यासाठी निवेदन देताना भारतीय जनसंसदचे तालुका अध्यक्ष रामराव भदगले ,कारभारी गरड ,प्रा. नानासाहेब खराडे अॕड.अजय रिंधे ,डॉ. करणसिंह घुले , डॉ. अशोक ढगे , संजय वाघमारे व इतर कार्यकर्ते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!