पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..

अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानायचे “जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भीमराव” असे अण्णाभाऊ म्हणायचे.

Spread the love

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानायचे “जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भीमराव” असे अण्णाभाऊ म्हणायचे.

आवाज न्यूज :  चिंचवड प्रतिनिधी ०१ ऑगस्ट.

अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल जाणून घेऊया थोडक्यात..

महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनशील वाटचालीत अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्र ‘चळवळीमधील त्यांचे कार्य ही फार मोठे होते. शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पद्द्लितांच्या व्यथा-वेदना त्यांच्या साहित्यातून प्रकर्षाने उमटल्या. सर्व साहित्य प्रकारांना आपल्या अभिजात लिखाणाने त्यांनी समृद्ध केले. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.

अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानायचे “जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भीमराव” असे अण्णाभाऊ म्हणायचे. आपल्याला अजमार साहित्यातून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडून आणले. मुबई ही महाराष्ट्रातून वेगळी होऊ नये यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नाही तर रशियामध्ये गायला.

त्यांनी आपल्या जीवन काळात विविध विषयावर लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णने, कथा, कविता, गीते इत्यादी क्षेत्रात त्यांनी समृद्ध लेखन केले आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातून समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य दिसून येते. वैजयंता आणि फकिरा ह्या त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.
“माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीय काहीली. अशा सुंदर कविताही त्याच्या गाजलेल्या आहेत. या महान लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ साली निधन झाले झाले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक द्रष्टे समाजसुधारक
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे आणि भारताचे एक समाजसुधारक आणि लेखक होते. अण्णा भाऊ साठे यांचा जन्म सांगली गावाच्या वाटेगाव या खेड्यात मातंग समाजातील एका कुटुंबात झाला. औपचारिक शिक्षणाचा अभाव असूनही अण्णाभाऊ साठे यांनी मराठीत 35 कांदबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊ साठे कधीच शाळेत गेले नसले तरी, त्यांनी कुशाग्र अक्षर ज्ञान प्राप्त केले. अण्णाभाऊ साठे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरू मानायचे “जग बदल घालुनी घाव, सांगुन गेले मज भीमराव” असे ते म्हणायचे.

अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य , कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.

पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा त्यांनी दिला. आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या समृद्ध कलेने त्यांनी समाजसुधारणेचे त्यांचे उद्दिष्टय साध्य केले, त्यामुळे महाराष्ट्राच्या समाजसुधारकांच्या यादीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव अजरामर राहील, यात शंका नाही. “समाजात जगण्यासाठी ज्यांनी अभियानाचे स्थान,
साहित्य आणि लोककलेतून केला.समाजाचा पुननिर्माण”

समाजातल्या दुर्बल घटकांसाठी आयुष्य वेचणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे. राजन नायर यांनी यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मयूर जाधव, के. डी. वाघमारे, अरुण थोपटे व असंख्य जनसमूदाय उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!