ताज्या घडामोडी

जिल्ह्यात नाफेड अंतर्गत शासकीय हरभरा खरेदीला 17 केंद्रांवर सुरुवात, रात्रभर जागरण करून केली शेतकऱ्यांनी नोंदणी

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

रोज झालेली नोंदणी जाहीर करण्याची किसन सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा सुभाष पाटील यांची मागणी.* जळगाव जिल्ह्यातील 17 केंद्रांवर शासकीय हरभरा खरेदी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली असून त्याबाबत नोंदणी करण्याचे आदेश जिल्हा प्रणन अधिकारी जी एन मगरे यांनी दिले आहेत जळगाव जिल्ह्यात शेतकी संघ अमळनेर पारोळा, चोपडा, एरंडोल, धरणगाव कासोदा भुसावल, कोरपावली ,यावल रावेर मुक्ताईनगर, बोदवड ,जामनेर पाचोरा ,भडगाव, चाळीसगाव या केंद्रावर खरेदी करण्यास परवानगी दिलेली आहे हरभरासाठी 5335/- रुपये हमी भाव जाहीर करण्यात आला आहे प्रत्यक्ष खरेदी करण्याची तारीख अजून जाहीर झालेले नाही अमळनेर येथे हरभरा खरेदी करण्यासाठी नाव नोंदणी करणे साठी रात्रभर जागून शेतकऱ्यांनी केली नाव नोंदणी.
हरभरा पिकपेरा सात बारा उतारा, आधार कार्ड, बॅंक पास बुक , फो न इत्यादी कागद पत्र जमा करावीत. नोंदणी कर्मचारी यांनी रोजची झालेली नोंदणी वृत्तपत्रात देऊन प्रसिद्धी द्यावी बाबत मागणी किसन सेलचे जिल्हा कार्याद्यक्ष प्रा सुभाष पाटील अमळनेर यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!